अधिक मासामध्ये गर्दी,विठ्ठल मंदिर संवर्धनाची कामे 17 मेपर्यंत पूर्ण करा:जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केली मंदिर परिसरातील कामाची पाहणी‎

0
250_177730263869ef7c6eeab1d_p3.jpg



श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी अधिक मासात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत बाजीराव पडसाळी येथील सुरू असलेली कामे दि.१७ मे पर्यंत गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण क

.

श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा बाबत भक्तनिवास येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, नगराध्यक्षा प्रणिता भालके, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगुटे, सदस्य शकुंतला नडगिरे आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्तिकीयेन एस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करुन संबधीतांना आवश्यक सुचना दिल्या.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी, बाजीराव पडसाळी येथील कव्हर शेडचे काम सुरू असल्याने श्री वयोवृद्ध भाविकांना अडचणी येतात. अधिक मासात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता कव्हर शेडचे काम तात्काळ पूर्ण करावे. तसेच महालक्ष्मी व बालाजी मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी व्यंकटेश्वर मंदिर व महालक्ष्मी मंदिराचे काम तात्काळ पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

{अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून, बाजीराव पडसाळी येथील व्यंकटेश्वर मंदिर, महालक्ष्मी मंदिर, कव्हर शेड आदी कामे तात्काळ पूर्ण करावीत. {पुरातत्त्व विभाग व संबंधित कंत्राटदार यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी करून अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावीत. मंदिरात कोठेही पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. {दगडी कोटिंग कामे पुर्ण करावीत. प्रांताधिकारी व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांनी सुरु असलेल्या कामांचा दररोज आढावा घ्यावा. महालक्ष्मी मंदिर येथे भिंतींना ओलावा धरत असल्याने त्याची पाहणी करून तात्काळ उपाययोजना कराव्यात, पश्चिमद्वारचे काम तात्काळ सुरू करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed