नाशिक काॅर्पाेरेट जिहाद:कलमा पठण कर, तरच जन्नत मिळेल; निदाची पीडितेला धमकी, इनकॅमेरा सुनावणीत सरकारी वकिलांचा गंभीर आरोप
![]()
देशात खळबळ उडवून देणाऱ्या ‘कॉर्पोरेट जिहाद’, लैंगिक शोषण प्रकरणात संशयित निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी नाशिक रोड न्यायालयात ‘इनकॅमेरा’ सुनावणी झाली. “बकरी ईदमध्ये कलमा पठण कर तरच जन्नत मिळेल, नाहीतर जहन्नुममध्ये सडावे लागेल,’ अशी धमकी देत पीडित युवतीचे नाव बदलून तिची ३२ कागदपत्रे घेत मालेगाव येथील पार्टीकडे पाठवत तिचा ब्रेनवॉश केल्याचा गंभीर आरोप विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी कोर्टात केला. कोर्टाने तपासी अधिकारी व आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून निदाला दिलासा दिला नाही. तिच्या अटकपूर्व जामिनावर २ मे रोजी निर्णय होईल. पीडितेला मलेशियात पाठवण्याचा कट संदीप जाधव . नाशिक | मानवी तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या दानिश शेख याने एका पीडितेला नोकरीचे आमिष देत तिच्यासोबत संबंध ठेवले. पीडितेच्या आधार कार्डसह सर्व शैक्षणिक कागदपत्रे, बँक पासबुक, एटीएम, डेबिट व क्रेडिट कार्ड स्वतःकडे ठेवत आर्थिक व्यवहार केले. पीडितेचे नाव बदलून ‘हानिया’ असे नवे नाव नोंदवण्यासाठी मालेगावच्या पार्टीकडे कागदपत्रे दिली. मलेशिया येथे जॉबकरिता इम्रान नावाच्या व्यक्तीकडे पाठवण्याचा कट केला होता. धर्मांतराचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’ची विंग सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे. पीडितेच्या मोबाइलमध्ये इस्लामिक धर्माचे ॲप विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर या प्रकरणात धार्मिक दहशतीचा वापर करण्यात आला आहे. पीडितेला बकरी ईदच्या पवित्र महिन्यात कलमा पठण केल्यास जन्नत नशीब होईल. अन्यथा जहन्नुममध्ये जाशील, असे सांगून धर्माची भीती निर्माण करण्यात आली. बुरखा कसा घालावा, नमाज कशी पढावी याचे धडे दिले. बुरखा आणि मोहंमद पैगंबर यांच्या पवित्र जीवनाचे पुस्तक पीडितेकडून जप्त केले आहे. आरोपींनी पीडितेच्या मोबाइलमध्ये इस्लामिक धर्माचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून दिले होते. धर्माची शिकवण देणाऱ्या यूट्यूब लिंक्स, रील्स वारंवार पाठवल्या. यातील मध्यस्थ निदाला कुणी आश्रय दिला याचा तपास करण्यासाठी आरोपीची अटक व पोलिस कोठडी गरजेची असल्यामुळे हा अटकपूर्व जामीन मंजूर करू नये. ॲड. राहुल कासलीवाल (निदा खानचे वकील) : निदा खान आणि पीडिता मैत्रिणी आहेत, त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे आहे, धर्मांतरासाठी दबावाचा संबंध नाही. निदा गरोदर आहे, तिला या प्रकरणात नाहक गोवण्यात आले आहे. ॲड. मिलिंद कुरकुटे (पीडितेचे वकील) : निदा खान तीन महिन्यांची गरोदर असली तरी या प्रकरणाची तीच ‘मास्टरमाइंड’ आहे. धर्मांतराचा पाया तिने रचला असून तिची भूमिका मुख्य आहे. त्यामुळे तपासाच्या हितासाठी तिला जामीन देऊ नये, असे न्यायालयास पटवून दिले.
