मंत्री नितेश राणेंना 1 महिना कैदेची शिक्षा, नंतर स्थगिती:अभियंत्यावर चिखल टाकल्याप्रकरणी दोषी

0
orig_new-project-2026-04-28t063635910_1777338364.jpg




सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायालयाने २०१९ मधील चिखल टाकल्या प्रकरणात मंत्री नितेश राणे यांना दोषी ठरवत एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेऊ नये, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. मात्र, उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून न्यायालयाने नंतर शिक्षेला स्थगितीही दिली. या प्रकरणातील इतर २९आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी नमूद केले की, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात आवाज उठवण्याचा नितेश राणे यांचा हेतू असू शकतो. पण सार्वजनिक ठिकाणी सरकारी अधिकाऱ्याचा अपमान करण्याचा त्यांना अधिकार नव्हता. अशा घटना सतत घडत राहिल्यास सार्वजनिक अधिकारी सन्मानाने आपली जबाबदारी पार पाडू शकणार नाहीत, असे न्यायालयाने म्हटले. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्यासह ३० जणांवर दंगल, सरकारी कर्मचाऱ्याला कामापासून रोखण्यासाठी हल्ला आणि गुन्हेगारी कट यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता. घटना घडली तेव्हा नितेश राणे काँग्रेसमध्ये आमदार होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed