‘बुक स्ट्रीट’ उपक्रमात 10 हजार वाचकांना माेफत पुस्तके:पुस्तकांनी गजबजला डोंबिवलीचा फडके रोड, मोबाइल विसरून हजारो हात रमले उपक्रमात

0
730-x-548-new-2026-04-27t062123758_1777251054.jpg




ज्या रस्त्यावर रोज वाहनांच्या हॉर्नचा गोंगाट असतो तिथे रविवारी पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटासोबत पानांची सळसळ ऐकू येत होती. निमित्त होते डोंबिवलीच्या सांस्कृतिक शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या ‘बुक स्ट्रीट’ उपक्रमाचे. ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’ आणि ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात आज डोंबिवलीकर चक्क रस्त्यावर बसून वाचनाचा आनंद लुटताना दिसले. या उपक्रमाला भेट देणाऱ्या सुमारे १० हजार वाचकांना मोफत पुस्तक भेट देण्यात आले. वाचनसंस्कृती जिवंत व्हावी असे वाटते.. प्रत्येक शहरात असे उपक्रम व्हायला हवेत. यामुळे मोबाइलच्या युगात हरवत चाललेली वाचन संस्कृती जिवंत होईल.नवीन पिढीला ज्ञानाची कवाडे उघडतील, अशी भावना ज्येष्ठ वाचकाने व्यक्त केली. पै फ्रेंड्स लायब्ररीच्या वतीने २०१७ पासून पुस्तक आदानप्रदान उपक्रम राबवला जातो. पहाटेचा गारवा अन् पुस्तकांचा गराडा नेहरू रोड ते फडके रोड हा परिसर आज ‘वाचनालय’ झाला होता. पहाटे ५ वाजेपासूनच चिमुरड्यांपासून ते सत्तरीतील आजोबांपर्यंत सर्वांची पावले बुक स्ट्रीटकडे वळली. हजारो पुस्तकांमधून आवडीचे पुस्तक शोधताना वाचकांत आनंद दिसला. यानिमित्त वाचनप्रेमींना एक पुस्तक मोफत देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed