लवांदेंच्या वक्तव्याचा सिल्लोडमध्ये निषेध, गुन्हा दाखल करण्याची मागणी:सिल्लोडला सहायक पोलिस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांना निवेदन
![]()
प्रतिनिधी | कन्नड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांदे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कन्नड तालुका वारकरी संप्रदायाने केली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, विकास लवांदे यांनी अलीकडे घेतलेल्या पत्रकार परिषदेत वारकरी संप्रदायातील पूजनीय संत-महंतांविषयी आक्षेपार्ह, अवमानकारक विधान केले. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अशा वक्तव्यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या. समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. अशांतता वाढू शकते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही निवेदनात म्हटले आहे. भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये तत्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. कारवाई झाली नाही तर वारकरी संप्रदायाच्या वतीने कन्नड तालुक्यात तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही देण्यात आला. डॉ. रामचंद्र पवार यांनी निवेदन स्वीकारले. भावना, मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या जातील, असे आश्वासन दिले. यावेळी कृष्णा महाराज चव्हाण, राजेंद्र महाराज दांडगे, सुरेश महाराज आढाव, संतोष महाराज बुरकुल, विनोद महाराज चव्हाण, जय महाराज मोहिते, शिवदत्त महाराज राजगुरु, मनीष महाराज झाल्टे, विष्णु महाराज काळे, सोमनाथ महाराज कर्डीले, कृष्णा महाराज पवार, काका महाराज भोजने, ज्ञानेश्वर महाराज गोरे, मनीष महाराज पवार, सुनिल महाराज मोकासे, विजय महाराज हार्दे यांच्यासह वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ उपस्थित होते.
