धक्कादायक!:कळमनुरी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सौरभ साकळे यांची कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-27t200302724_1777300413.jpg




कळमनुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सौरभ साकळे (२७) यांनी त्यांच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ता. २७ घडली आहे. त्यांच्यावर सायंकाळी कळमनुरी येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कळमनुरी येथील एका दैनिकाचे तालुका प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या सौरभ यांनी मागील सात वर्षात शहरासह तालुक्यातील प्रश्‍नांना वाचा फोडली आहे. बातम्यांच्या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्‍न मांडून त्यांची सोडवणुक देखील केली आहे. परखड लिखान करणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. दरम्यान, कळमनुरी येथे त्यांनी एक छोटेखानी कार्यालय सुरु केले होते. नेहमी प्रमाणे आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते कार्यालयात आले. त्यानंतर त्यांनी कार्यालयाचा समोरील दरवाजा आतून बंद करून पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने सदर प्रकार लक्षात आल्यानंतर पत्रकारांनी घटनास्थळी गर्दी केली. कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, जमादार रवी इंगोले, लक्ष्मीकांत माखणे, गजानन होळकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या कार्यालयाचा पाठीमागील दरवाजा उघडा असल्याने त्यांना खाली उतरवून कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटूुंबियांच्या हवाली करण्यात आला. कळमनुरी येथील स्मशानभुमीत सायंकाळच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्‍चात आई, दोन भाऊ, बहिण असा परिवार आहे. या घटनेमुळे शहरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed