तहसीलदारांना भाकरी-कांद्याची भेट; गॅस टंचाईवरून आंदोलन:गॅस टंचाईच्या विरोधात चुलीवर भाकरी करून वंचितचे प्रदर्शन
![]()
‘नरेंदर कब मिलेगा सिलिंडर’ अशा संतप्तपणे घोषणा देत चुलीवर भाकरी करून प्रशासन तथा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गॅस टंचाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे वतीने तिवसा तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच तहसीलदारांना भाकरी-कांद्याची भेट देण्यात आली. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरशिरसाट हे गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी रांगेत उभे असताना त्यांचा मृत्यू झाला होता. तसेच जिल्ह्यात रिद्धपूर येथेही एका तरुणाचा मृत्यू झाला होता. सिलिंडरच्या तुटवड्यामुळे स्वयंपाक घरात जेवण तयार करणे कठिणी झाले आहे. चहा टपरी, लहान व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली आहेत. खाणवळीत गॅस सिलिंडर नसल्याने अनेक विद्यार्थी शहरातून गावाकडे परत आले आहेत.अनेक ठिकाणी वाढीव दराने सिलेंडर विक्री सुरू असून त्याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर होत आहे. या ज्वलंत प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राजव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. प्रतिसाद म्हणून तिवसा तालुका वंचित बहुजन आघाडीचे वतीने तहसील कार्यालयासमोर चुलीवर भाकरी करून तहसीलदारांना भाकर व कांद्याची भेट दिली. याप्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी नायब तहसीलदार यांचे समोर तालुक्यात होत असलेल्या सिलेंडरचा टंचाई व काळाबाजार होत असल्याबाबत यावर कारवाई करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी केली. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दादा गडलिंग, युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते, जिल्हा सदस्य प्रमोद मुंद्रे, विनोद खाकसे, मुस्ताक शहा, डॉ. धर्मेंद्र दवाले, सिद्धार्थ कटरने, प्रवीण निकाळजे, अनिल सोनोने, नितीन थोरात, अवधूत सोनाने, मिलिंद खाकसे, अनिल गाडगे, रुपाली मुंद्रे, शांता कापसे, सोनाली पाटील, नलिनी अढाऊ, अलका कापसे, सुमन हेंडवे, वंदना कापसे, दुर्गा अढाऊ, वंदना कापसे, सविता दहाट, अनिता ढोके, राजकन्या ससाणे सह वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिल्याने तिवसा तहसील कार्यालयासमोर चूल मांडून भाकरी करत तहसीलदारांना भाकरी व कांदा भेट देत गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य जनतेला होत असलेल्या वेदनेचा आक्रोश मांडण्यात आला. तसेच तिवसा तालुक्यात होत असलेली कृत्रिम गॅस टंचाई व काळाबाजार तत्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा लवकरच सिलिंडरच्या गोडाऊन समोर आंदोलन करू असा इशारा सागर भवते यांनी यावेळी दिला.
