Had paratha in the canteen and paid the bill, new CEO won hearts on the first day, discussion on promptness and working style
![]()
जिल्हा परिषदेचे नवनियुक्त सीईओ सत्यम गांधी यांनी आज, सोमवारी सकाळी आपली नवी जबाबदारी स्वीकारली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ विनय ठमके यांच्याकडून त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली. सूत्रे स्वीकारताच त्यांनी जि.प. मुख्यालयातील सर्व विभागांची प्रत्यक
.
सूत्रे स्वीकारताच पहिल्याच दिवशी सर्व विभागांची पाहणी करून कॅन्टीनवरील पदार्थांची चव घेणारे सत्यम गांधी हे पहिले सीईओ ठरले आहेत. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीची अन् तत्परतेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सत्यम गांधी हे सन २०२१ च्या तुकडीचे आयएएस आहेत. येथे येण्यापूर्वी ते सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करण्याचा पूर्वानुभव त्यांच्याकडे आहे. त्याची प्रचिती आजच्या पाहणीदरम्यान सर्वांनाच आली.
प्रत्येक विभागात पोहोचून तेथील विभागप्रमुखाचे दालन, त्यांची तेथील उपस्थिती-अनुपस्थिती, ते कोण आहेत, हे सामान्यांना कळावे, यासाठी त्यांच्या नेमप्लेटची अनिवार्यता, कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे, आदी मुद्द्यांवर त्यांनी या पाहणीदरम्यान भर दिला. बांधकाम उपविभागातील एक विभागप्रमुख अनुपस्थित होते. त्यांच्या दौऱ्याची नोंद आहे की नाही, हेही त्यांनी जाणून घेतले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, स्वीय सहायक ज्ञानेश्वर घाटे, त्यांच्यासोबत होते.
अटीबाबत दक्ष, कर्मचाऱ्यांची परीक्षा प्रत्येक विभागात पोहोचल्यानंतर सीईओंनी तेथील विभागप्रमुखांशी बोलणी केली. त्या विभागात किती कर्मचारी आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत आदी जुजबी माहिती जाणून घेतली. काही कर्मचाऱ्यांशी विशेषत: आयटीशी निगडित कर्मचाऱ्यांची त्यांनी एकप्रकारे परीक्षासुद्धा घेतली. शासनाच्या इ-गर्व्हनन्समध्ये आवश्यक असलेली कौशल्ये त्या कर्मचाऱ्याकडे आहेत की नाही, हे त्यांना जाणून घ्यायचे होते.
