संस्कृतीच्या संवर्धनासाठी संमेलनाची गरज, धर्माचे रक्षण करू:हिंदू संमेलनात उमटला सूर, न्यू राधाकिसन प्लॉट, जुना आळशी प्लॉट येथे करण्यात आले होते आयोजन
![]()
न्यू राधाकिसन प्लॉट व जुना आळशी प्लॉट येथील नागरिकांच्या वतीने हिंदू संमेलन आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थान व संवर्धनासाठी हिंदू संमेलनाची जागोजागी आवश्यकता असून अशा संमेलनाच्या माध्यमातून आपण आपल्या आदर्शमय परंपरा व धर्माचे योग्य प
.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मेहरबानू विज्ञान महाविद्यालयात आयोजित या संमेलनाचा प्रारंभ राणी सती धाम येथून शोभायात्रेने करण्यात आला. या शोभायात्रेत जुना आळशी प्लॉट व न्यू राधाकिसन प्लॉट परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. बँड बाजाच्या गजरात ही शोभायात्रा न्यू राधाकिशन प्लॉट, जुना आळशी प्लॉट परिसरातून मेहरबानू विज्ञान महाविद्यालयात या शोभायात्रेचे संमेलनात रूपांतर झाले. शोभायात्रेचे ठिकठिकाणी अनेक नागरिक व स्वयंसेवी संस्था, मंडळांनी उस्फूर्त स्वागत केले. न्यू राधाकिसन प्लॉटमध्ये या शोभायात्रेवर समाजसेवी कुंजीलाल जाजू, अनुसया जाजू व त्यांच्या कुटुंबाने पुष्प वर्षाव करत शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत केले.
संमेलनाचा प्रारंभ भारत माता प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आला. यात प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू सेवा संघाचे महाराष्ट्र प्रभारी हनुमान गढी अयोध्या येथील सुनील महाराज, हिंदू जागरण मंचाच्या वक्त्या अॅड. ममता तिवारी, पंडित सुदर्शन शर्मा तर प्रमुख वक्ते म्हणून रुपेश शाह आदी उपस्थित होते. सर्वप्रथम न्यू राधाकिसन प्लॉट व जुना आळशी प्लॉट येथील नागरिकांच्या वतीने पाहुण्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. बालिका खुशी जोबनपुत्रा हिच्या गणेश वंदनाने व बालिका अनुष्का शर्मा हिच्या द्रोपदी वस्त्रहरण गीत नाट्याने या संमेलनास प्रारंभ करण्यात आला. सूत्रसंचालन शालिनी पिंपळे, दीपिका ठाकूर यांनी तर आभार धर्मेश वैद्य यांनी मानले.वंदे मातरम ने या संमेलनाची सांगता झाली.
हनुमान चालिसाचे पठण संमेलनात मातृशक्तींनी हनुमान चालिसा पठण करून ऊर्जा निर्माण केली. यावेळी शताब्दी पार करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा कार्याची माहिती देण्यात आली. सुनील महाराज, पंडित सुदर्शन शर्मा, प्रमुख वक्ते रुपेश शाह आदींनी आपले विचार व्यक्त करीत हिंदू संमेलनाची उपयुक्तता प्रतिपादित करीत नागरिकांनी स्वयंपूर्ण धर्म रक्षणासाठी जागृत होऊन धर्माची पताका समाजात गतिमान करण्याचे आवाहन केले. पं सुदर्शन शर्मा यांनी हिंदू संमेलनाची आवश्यकता का आहे याची विमांसा करीत आजच्या परिस्थितीत हिंदूंचे एकत्रीकरण ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
