[ads1]
![]()
सिल्लोड शहरातील ४२ वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या महाराणा प्रताप गणेश मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात धार्मिक व सांस्कृतिक वैभवाचा अनोखा नजराणा सादर केला आहे. ‘आपली संस्कृती, आपली परंपरा’ या ब्रीदवाक्याला जागून मंडळाने या वर्षी ‘जागर आदिशक्तीचा, उत्सव श्रीगणेशाचा’ ही संकल्पना राबवली आहे. याअंतर्गत माता वैष्णोदेवीच्या निसर्गरम्य गुहेसह महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचे दिव्य दर्शन घडवणारा आकर्षक देखावा साकारण्यात आला असून तो पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. या भव्य देखाव्याचे अधिकृत उद्घाटन सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे आणि सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी महाआरती करून देखावा भाविकांसाठी खुला करण्यात आला. देखावा पाहण्यासाठी आणि श्रीगणेशासह आदिशक्तीच्या दर्शनासाठी दररोज भाविकांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. हा अभूतपूर्व देखावा साकारण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व सदस्यांनी तब्बल दीड महिना अहोरात्र मेहनत घेतली आहे. गेल्या ४२ वर्षांत या मंडळाने नेहमीच समाजप्रबोधन आणि जनजागृतिपर विषयांवर भर दिला आहे. यापूर्वी मंडळाने ‘ऑपरेशन सिंदूर’, ‘चांद्रयान-३’, ‘बारा ज्योतिर्लिंग’, ‘अयोध्या राम मंदिर’, ‘निर्भया हत्याकांड’ आणि ‘व्यसनमुक्ती’ यांसारख्या अत्यंत संवेदनशील व सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक देखावे सादर करून नागरिकांची मने जिंकली आहेत. मंडळाच्या या सामाजिक बांधिलकीची दखल घेत गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना तालुकास्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चित्रकला, निबंध, रील्स स्पर्धा आणि विविध शासकीय नागरी योजनांचे मार्गदर्शन व सेवा-सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जात आहे. या उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाने केले आहे. मंडळ केवळ देखाव्यापुरते मर्यादित न राहता वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवते. उत्सवादरम्यान मंडळातर्फे र क्तदान, मोफत नेत्र तपासणी शिबिर, बालकांसाठी व तरुणांसाठी लाठीकाठी आणि कराटे प्रशिक्षण आयोजित केले जाते. विविध सामाजिक उपक्रमांची रेलचेल
[ads2]
सिल्लोडला अवतरली साडेतीन शक्तिपीठे:महाराणा गणेश मंडळाचा 42 वर्षांपासून विविध देखाव्यांचा उपक्रम
















Leave a Reply