[ads1]
![]()
अयोध्येतील राम मंदिराच्या पुजाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. यामध्ये पुजाऱ्यांनी केस, दाढी, मिशा आणि शेंडी ठेवावी किंवा पूर्णपणे क्लीन शेव्ह राहावे, असे सांगण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर कपाळावर तिलक लावणे अनिवार्य असेल. दररोज पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे लागतील. शौचास गेल्यानंतर स्नान केल्याशिवाय मंदिरात प्रवेश करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास गायीचे दूध, तूप आणि दही याने शुद्धीकरण केले जाईल. राम मंदिर धार्मिक समितीचे सदस्य आणि श्रीरामवल्लभाकुंजचे प्रमुख स्वामी राजकुमार दास यांनी दैनिक भास्करला नवीन मार्गदर्शक तत्त्वांची माहिती दिली. त्यांनी सांगितले- १२ सप्टेंबर रोजी राम मंदिर ट्रस्टच्या धार्मिक समितीची बैठक झाली होती. यामध्ये सर्वांच्या संमतीने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. पुजाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. सर्वांना नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. पुजारी गर्भगृहात मोबाइल घेऊन जाऊ शकणार नाहीत मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पुजारी गर्भगृहात मोबाइल घेऊन जाऊ शकणार नाहीत. त्यांना मंदिरासंदर्भात सोशल मीडियावर वक्तव्ये करण्यापासून दूर राहावे लागेल. व्हॉट्सॲप किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राम मंदिराबाबत लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, अशी कोणतीही गोष्ट करू नये. भाविकांशी चांगले वर्तन करावे लागेल. पुजाऱ्यांना हसणे-विनोद करणे टाळावे लागेल सेवेच्या वेळी पुजाऱ्यांना आपल्या निर्धारित ठिकाणीच राहावे लागेल. आवश्यक कामासाठी ठिकाण सोडायचे असल्यास आधी पाळीप्रमुखांना (शिफ्ट इन्चार्ज) कारण सांगून माहिती द्यावी लागेल. त्यानंतरच सेवास्थळ सोडता येईल. अनावश्यक बोलणे, गट करून चर्चा करणे आणि हसणे-विनोद करणे टाळावे लागेल. एखादी घटना घडल्यास शांत राहून ती हाताळण्याचा प्रयत्न करावा लागेल. गरज भासल्यास जबाबदार व्यक्तींकडून सहकार्य आणि मार्गदर्शन घ्यावे लागेल. भाविकांशी अनावश्यक बोलणे टाळावे, जेणेकरून त्यांच्या मनात अर्चक किंवा राम मंदिराबाबत चुकीची धारणा निर्माण होणार नाही. अडचण असल्यास आचार्यजींना सांगा मंदिराकडून मिळालेल्या भोग-प्रसादाव्यतिरिक्त बाहेरील कोणतीही वस्तू गर्भगृहात नेता येणार नाही. कोणावरही विनाकारण टिप्पणी करणे किंवा स्वतःचा अधिकार गाजवणे टाळावे लागेल. अडचण किंवा असमाधान असल्यास आचार्यजींना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. कुटुंबीय किंवा इष्टमित्र आल्यास दर्शन, प्रसाद आदींसाठी आचार्यजी मदत करतील किंवा त्यांच्या निर्देशानुसार मदत केली जाईल. इतर कोणत्याही व्यक्तीसाठी अशा प्रकारची विशेष मदत किंवा वर्तन केल्यास संबंधित पुजारी स्वतः जबाबदार असतील. स्वच्छतेसाठी सेवकांना सोने, चांदी आणि इतर धातूंची भांडी देण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर त्यांची मोजणी करावी लागेल.
[ads2]
रामलल्लाचे पुजारी दाढी-मिशी ठेवणार की क्लीन शेव्ह राहतील:नियम मोडल्यास शुद्धीकरण केले जाईल; नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काय विशेष ते वाचा
















Leave a Reply