13 तालुकाप्रमुखांना कार,शिंदे गटाच्या आमदाराचा नवा फॉर्म्युला:जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी शिवसेनेची तयारी, गावागावांत संपर्क वाढवणार

[ads1]


नाशिक जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नवी रणनीती आखली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पक्षाचा संपर्क वाढवण्यासाठी जिल्ह्यातील 13 तालुकाप्रमुखांना नव्या कोऱ्या कार देण्यात येणार आहेत. आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने या 13 वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांचा वापर केवळ पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी करण्याच्या सूचना तालुकाप्रमुखांना दिल्या जाणार आहेत. तालुकाप्रमुखांना गावागावांत दौरे करून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवता येणार आहे. तसेच घरोघरी जाऊन नागरिकांशी संपर्क साधण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘शिवसेना आपल्या दारी’ अभियान या वाहनांच्या माध्यमातून ‘शिवसेना आपल्या दारी’ हा संदेश गावागावांत पोहोचवला जाणार आहे. प्रत्येक कारवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची छायाचित्रे लावण्यात येणार आहेत. वाहनांच्या माध्यमातून तालुकाप्रमुखांना आपल्या कार्यक्षेत्रातील विविध गावांना नियमित भेटी देता येणार असून पक्षाचे कार्यक्रम आणि संघटनात्मक उपक्रम राबवता येणार आहेत. वाहने दिल्यानंतर तालुकाप्रमुखांच्या कामकाजावरही पक्षाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. तालुकाप्रमुखांनी पक्षासाठी केलेल्या दैनंदिन कामाचा अहवाल घेतला जाणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली आहे. पक्षाला वर्षभर सक्रिय ठेवून निवडणूक मोडमध्ये संघटन काम सुरू ठेवण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर लक्ष विधानसभा आणि महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात शिवसेनेकडून ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. तालुकाप्रमुखांना वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यांना मोठ्या क्षेत्रात सातत्याने दौरे करता येणार आहेत. त्यातून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांच्यातील संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे लंडनहून परतल्यानंतर पुढील आठवड्यात या वाहनांचा लोकार्पण सोहळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेनेच्या या नव्या संघटनात्मक प्रयोगाची चर्चा सुरू झाली आहे. हेही वाचा… नागपूरच्या इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचे नाव:देवेंद्र फडणवीस-नितीन गडकरींच्या उपस्थितीत लोकार्पण नागपूरमधील इंदोरा ते दिघोरीदरम्यानच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे. शहरातील हा सर्वात लांब उड्डाणपूल असून, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला. सविस्तर वाचा…

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *