[ads1]
![]()
हडपसर भागात एका ज्येष्ठ नागरिकाची औषध निर्मिती कंपनीत नोकरी लावण्याच्या आमिषाने 4 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी धनंजय शामराव वराडकर (रा. माळवाडी, हडपसर) याच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे हडपसरमधील ससाणेनगर भागात राहतात. आरोपी धनंजय वराडकर याची त्यांच्याशी ओळख होती. त्याने ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाला आणि मुलीला हडपसर येथील एका प्रसिद्ध औषध निर्मिती कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या आमिषाने आरोपीने गेल्या दोन वर्षांत वेळोवेळी त्यांच्याकडून एकूण चार लाख रुपये घेतले. नोकरीबाबत विचारणा केली असता, आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. सलगर करत आहेत. विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात, महिलेची 22 लाखांची फसवणूक दरम्यान, विवाहविषयक संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीतून एका महिलेची 22 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका अज्ञात आरोपीविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनवाडी भागात राहणाऱ्या तक्रारदार महिलेने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यानंतर आरोपीने तिच्याशी संपर्क साधला. त्याने स्वतः फ्रान्समधील एका कंपनीत कामाला असल्याचे सांगितले आणि विवाहविषयक संकेतस्थळावर बनावट नावाने प्रोफाईल तयार केले होते. आरोपीने महिलेला भेटण्यासाठी फ्रान्समधून भारतात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर सीमाशुल्क विभागाने (कस्टम) त्याचे आठ हजार युरो परदेशी चलन जप्त केल्याचे नाटक केले. कस्टमची कारवाई टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे त्याने महिलेला सांगितले. यानंतर आरोपीने वेगवेगळ्या कारणांखाली महिलेकडून एकूण 21 लाख 89 हजार रुपये घेतले. महिलेने ही रक्कम एका बँक खात्यात जमा केली. नंतर आरोपीचा मोबाइल क्रमांक बंद आल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
[ads2]
हडपसरमध्ये नोकरीच्या आमिषाने फसवणूक:ज्येष्ठ नागरिकाकडून 4 लाख रुपये उकळले, एकावर गुन्हा दाखल
















Leave a Reply