सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हदगाव येथील सुमन मंगल कार्यालयात युवा नेते भागवत देवसरकर यांनी आयोजित केलेला भव्य शेतकरी मेळावा व कृतज्ञता सोहळा प्रचंड यशस्वी झाला. तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी गर्दी करून या कार्यक्रमाने गर्दीचा आजवरचा विक्रम मोडला.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक –
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. क्षिप्रा मानकर यांनी अत्यंत खुमासदार पद्धतीने केले, तर महिला प्रदेशाध्यक्ष लक्ष्मी पाटील यांनी आपल्या मनोगतातून शेतकरी महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आयोजक भागवत देवसरकर यांनी या मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.
कवयित्री कुंदन पाटील यांच्या वास्तववादी कवितेला प्रचंड दाद –
या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरल्या प्रसिद्ध कवयित्री कुंदन पाटील. त्यांनी शेतकऱ्यांच्या जगण्यातील वास्तव, दुष्काळ, अतिवृष्टी, बळीराजाचे कष्ट यावर अत्यंत वास्तववादी कविता सादर केल्या. “शेतकऱ्याच्या नशिबी का नेहमीच रडणं…” या त्यांच्या कवितेने उपस्थित हजारो शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले.
यावेळी कृषी विद्यापीठाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भेदे यांनी हळद, ऊस आणि सोयाबीन पिकांवरील किडी व रोगांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मान्यवरांची उपस्थिती व सत्कार –
या कार्यक्रमास आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार किसनराव वानखेडे, महापौर कविताताई मुळे, कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत आठरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष लक्ष्मी पाटील, भाजप नेते शेखर पाटील कोळीकर, अॅड. रावसाहेब देशमुख, तुकाराम चव्हाण, मंडलाध्यक्ष गजानन चायल, सूर्यकांत हानवते, प्रकाश राठोड, दत्ता जाधव, ज्ञानोबा गायकवाड, वैभव खुडे, नगरसेवक संदीप भुरे, सचिन सूर्यवंशी, साई बाभुळकर, काळे सर, डॉ. संदीप कारंजकर, ओम इदेवार, देवानंद वानखेडे, परमेश्वर काळे, देवानंद कदम, योगेश डाखोरे, विशाल पेंटेवार यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
मान्यवरांची भाषणे –
यावेळी बोलताना आमदार अमरनाथ राजूरकर म्हणाले की, “भागवत देवसरकर यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी, नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे खंबीरपणे उभे आहेत.”
तर आमदार किसनराव वानखेडे म्हणाले की, “भागवत देवसरकर हा सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्ता असून भविष्यातील मोठा नेता होणार आहे. गेली वीस वर्षांपासून ते जनतेची अविरत सेवा करणारे कार्यकर्ते आहेत.”
हदगाव तालुक्यात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना एकत्र आणून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आयोजक व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.










Leave a Reply