[ads1]
![]()
एकीकडे रक्षाबंधन साजरे होत असतानाच पालीवाल ब्राह्मण समाजाकडून पालीवाल एकता दिन स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. वृंदावन नगर येथील श्रीमती तारा पालीवाल यांच्या ”तारांगण ओपन हॉल”मध्ये आयोजित स्नेहसंमेलनात पालीवाल समाजाचे बांधव एकत्र आले होते. पालीवाल एकता दिनानिमित्त पूर्वजांच्या बलिदानाला अभिवादन करण्यात आले. संघटित समाजच सशक्त राष्ट्राची निर्मिती करू शकतो. असे मत डॉ. योगेश पालीवाल यांनी याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामेश्वर पालीवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून रवी पालीवाल व पंकज पालीवाल उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पालीवाल ब्राह्मणांचे शहीद स्मारक मानल्या जाणाऱ्या “धौला चौतरा’ (धोलना कुंवा) च्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून झाली. उपस्थित सर्व समाजबांधवांनी पुष्पहार अर्पण करून शहिदांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्य वक्ते डॉ. योगेश पालीवाल म्हणाले की, “केवळ एक संघटित समाजच सशक्त आणि सुदृढ राष्ट्राचा पाया रचू शकतो.” सध्याच्या काळात ”मी मोठा की तू लहान” या आंधळ्या स्पर्धेमुळे माणसे स्वतःच्याच लोकांपासून दुरावत चालली आहेत. याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. बदलती जीवनशैली आणि आधुनिक विवाह संस्कृतीवर बोलताना ते म्हणाले की, “पूर्वीच्या पारंपरिक कौटुंबिक सोहळ्यांची जागा आता हॉटेल्स आणि डेस्टिनेशन वेडिंग्जने घेतली आहे. कार्यक्रमाला प्रामुख्याने डॉ. मनीषा पालीवाल, अनुसया पालीवाल, जानकी पालीवाल, रवी पालीवाल, याशी पालीवाल, श्रद्धा पालीवाल, आर्यन पालीवाल, जया पालीवाल, सिद्धेश पालीवाल, देवांशी पालीवाल, नैतिक पालीवाल, हिमांशी पालीवाल यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. समाजाच्या इतिहासावर प्रकाश टाकताना डॉ. पालीवाल यांनी सांगितले की, सुमारे ७३४ वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणादरम्यान पालीवाल समाजाच्या पूर्वजांनी अदम्य साहस दाखवले होते. मातृभूमी व स्वाभिमानाच्या रक्षणासाठी लाखो बांधवांनी बलिदान दिले. हे ऐतिहासिक बलिदान राखी पौर्णिमेच्या दिवशी घडला आहे.
[ads2]
रक्षाबंधन साजरे न करता पाळला पालीवाल एकता दिन:पूर्वजांच्या बलिदानाला अभिवादन; डॉ. पालीवाल यांचे मार्गदर्शन
















Leave a Reply