[ads1]
![]()
मोहन भागवत जी विधाने अमेरिकेत करत आहे ती विधाने भारतात आल्यावर केली पाहिजे. नागपूर आणि दिल्लीमध्ये असे विधाने त्यांनी केली पाहिजे. संघाने भारतात एक आणि बाहेर देशात एक अशी भूमिका घेऊ नये, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे विलीनीकरण होणार नाही, शरद पवारांनी काय सुनेत्रा पवार यांच्या हाताखाली काम करायचे का? त्यांची प्रकृती साथ देत नसली तरी ते शरद पवार आहे. त्यांच्या पक्षात हुशार लोकं आहेत ते योग्य निर्णय घेतील. संजय राऊत म्हणाले की, शिंदे यांनी शहा यांना आमचे लोकप्रतिनिधी आणि मंत्री सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत अस्वस्थ आणि घाबरलेले असल्याचे सांगितले. यावर शहा यांनी मी आहे घाबरू नका, सर्व काही सेट होईल, असे आश्वासन दिल्याचा आरोप राऊत यांनी केला. याशिवाय दिल्ली अधिवेशनादरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 6 खासदारांनाही शहा यांनी न्यायालयाच्या निकालाची चिंता करू नका, ते सगळे मी पाहून घेईन, असे म्हटल्याचे राऊतांनी सांगितले. कोर्ट तुमच्या खिशात आहे का? संजय राऊत म्हणाले की, दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू असताना आम्हाला सोडून गेलेले 6 खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत अमित शहा यांना भेटले. त्यावेळी दोन खासदारांनी न्यायालयात काय होईल ही चिंता व्यक्त केली. यावर शहांनी ते सगळे सेट होईल त्यांची चिंता तुम्ही करू नका, मी पाहूण घेईल असे त्यांना म्हटले होते. कालही ते तेच म्हणाले. या देशाचे संविधान आणि सुप्रीम कोर्ट विकत घेतले जाते का? ते यांच्या खिशात आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. माझा पक्ष आहे मी बघून घेईल असे जर ते म्हणत असतील तर देशातीन न्याय व्यवस्थेवरचा विश्वास नष्ट होत असतो. हा संवाद काही वृत्त पत्रांमध्ये छापून सुद्धा आला आहे. गद्दार लोकं शहांना भेटतात त्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा विचार करू नका असे शिंदे गटातील लोकांना गृहमंत्र्यांकडून
सांगितले जाते. कोर्टात आमचा विजय नक्की होईल संजय राऊत म्हणाले की, देवेंद फडणवीस, राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एकच सांगत आहेत की निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागणार. यावर आमचे काही म्हणणे नाही, केवळ हे लोकांसमोर आणणे गरजेचे आहे. यामुळे सुप्रीम कोर्टाची प्रतिष्ठा धुळ्यास मिळते आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे, आमचा विजय नक्की होईल. कारण जिथे धर्म आहे त्यांचा विजय होईल. आम्ही धर्माच्या बाजूने आहोत. एकनाथ शिंदे स्वत: म्हणत आहे की आमचे लोकं घाबरले आहे. संविधान विकत घेतले जाणार नाही.
हे ही वृत्त वाचा नागपुरात भीषण अपघात:भरधाव कारने पादचाऱ्याला चिरडले, दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात, चालकाने मद्यपान केल्याचा संशय नागपुरातील जपानी गार्डन रोडवर आज पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कैलास सनोडिया असे या अपघातात प्राण गमावलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. वाचा सविस्तर
[ads2]
















Leave a Reply