गो मातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्या:पाच कोटी जनता 1 डिसेंबर रोजी मुंबईत येणार, गोपालनंद सरस्वती महाराज यांची माहिती

[ads1]


राष्ट्राची रक्षा करण्यासाठी गोमातेची सेवा करणे व गोवंश वाचविणे आवश्यक आहे. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा व इतर मागण्यासाठी गो सम्मान अभियान अंतर्गत येत्या एक डिसेंबर रोजी तिसऱ्या टप्यात पाच कोटी अकरा लाख गोभक्त देशभरातून मुंबईला जाऊन कोट्यावधी गोसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन राज्य सरकारला देणार असल्याची माहिती गोपालनंद सरस्वती महाराज यांनी रविवारी ता. 30 हिंगोली येथे दिली. हिंगोली येथील महावीर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशभरात हजारो गायीची कत्तल केली जात आहे. तर असेच आपण शांत बसलो तर पुढील पिढी साठी गोवंश दिसणार नाही. त्यामुळे प्रत्येकानी गावागावात बचत गटाच्या माध्यमातून गो संगोपालन केल्यास गोमूत्र, दूध, दही, तूप, आपल्याला मिळणार असून खत देखील शेतात टाकल्यास जमिनीचा पोत राखता येणार आहे. गोमाता वाचविण्यासाठी गोभक्तांनी गाव पातळीवर जाऊन जनतेला भेटावे त्यांना गाय हि आपली माता आहे हे पटवून द्यावे. गोवंश वाचविण्यासाठी आपल्याला मुंबईला यावे लागणार आहे. देशभरात एक अरब 40 करोड लोकसंख्या आहे. दहा करोड सनातनी मानव आहोत आता सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. गोवंश सुरक्षित ठेवण्यासाठी पहिल्या टप्यात स्वाक्षऱ्या करून निवेदन देण्यात आले. तर दुसऱ्या टप्यात सव्वा पाच कोटी गोभक्ताच्या स्वाक्षऱ्या घेऊन पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. गोमातेला राष्ट्र मातेचा दर्जा द्यावा, संपूर्ण भारतात गोहत्तेवर बंदी घालावी, गोसेवा मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, आदी मागण्यासाठी आंदोलनाचा तिसरा टप्पा हाती घेण्यात आला आहे. यामध्ये पाच कोटी गोभक्त ता. 1 डिसेंबरला मुबंईत जाऊन राज्यपाल, मुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहेत. आपल्या 36 मागण्या असून यातील केवळ तीन मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता या आंदोलनात सर्व साधू संत मंडळी, शेतकरी, गोप्रेमी आदिनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *