Diwali Lantern

तुकाराम मुंढेंसारखे चांगले अधिकारी द्या, सगळे सुधारेल:चाकण एमआयडीसीवरून आदित्य ठाकरेंची मागणी, सरकारवरही साधला निशाणा




महाराष्ट्रातील हजारो कंपन्या बंद पडत असल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापले असताना, आता पुण्याच्या चाकण एमआयडीसीतील सुमारे 20 लघुउद्योजकांनी आपल्या कंपन्यांना टाळे ठोकण्याची प्रक्रिया सुरू केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एमआयडीसी परिसरातील अभूतपूर्व वाहतूक कोंडी, रस्त्यांची झालेली कमालीची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे वारंवार होणारे जीवघेणे अपघात या रोजच्या त्रासाला कंटाळून या उद्योजकांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे राज्यभरात पुन्हा एकदा उद्योग क्षेत्राच्या स्थितीवरून आणि पायाभूत सुविधांच्या अभावावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. चाकणमधील या गंभीर परिस्थितीवरून आता राजकारण चांगलेच तापले असून, विरोधकांनी राज्य सरकारविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाढत्या दबावानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने सूचना दिल्याने स्थानिक प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज चाकण एमआयडीसी परिसराला भेट देऊन तेथील खड्ड्यांची व रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करत, “येथील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या शिस्तबद्ध अधिकाऱ्याची नितांत गरज आहे,” असे स्पष्ट मत आदित्य ठाकरे यांनी यावेळी मांडले. आदित्य ठाकरे म्हणाले, आपण पाहिले की मागच्या आठवड्यात महाराष्ट्रातून अनेक उद्योग बाहेर गेले. त्यामुळे रोजगारावर परिणाम झाला आहे. इथेल उद्योजक सांगतात त्यांना सुविधा मिळत नाही. वीज, पाणी, रस्ते चांगले नाहीत. या परिसरातून 20 उद्योग बाहेर जाण्याच्या मार्गावर आहेत. तसेच इथे कचऱ्याचे साम्राज्य आहे. राजकीय नेत्यांचे असे दौरे ठरल्यानंतर रस्त्याची डागडुजी करण्यात आली. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत, इथे कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. उद्या उद्योगमंत्री येत आहेत, तुम्ही उद्या येऊ नका, उद्या रविवार आहे. कामाच्या दिवशी या, ताफा घेऊन येऊ नका, सामान्य माणसाप्रमाणे या, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारखे चांगले अधिकारी द्या इथे सत्तेतल्या आमदाराचे सुद्धा ऐकले जात नाही, इथे MIDC मध्ये 15 रुपये पर स्क्वेअर रेट आहे, मिसिंग लिंकही वर्षभरातच खराब झाला आहे. मला अनेक लोक त्यांच्या अडचणी सांगत होते. ट्रॅफिक समस्या, वाहतूक परिणामाचा आरोग्यावरही परिणाम होत आहे. आपण सगळे आज बघतोय एक चांगले अधिकारी नाहीत, एक व्यक्ती द्या हे सगळे सुधारेल. तुकाराम मुंढे यांच्यासारखे चांगले अधिकारी द्या. आपल्या सरकारकडे खेळात प्रथम आलेल्यांना अधिक निधी दिला जातो. मात्र रस्ते/खड्डे अपघातातील मृतांच्या नातेवाईकाना नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🇮🇳 Happy Independence Day 🇮🇳