Diwali Lantern

आधुनिक भारताचे मॉडेल म्हणजे पिंपळदरी:अभिजीत दिपकेंचे प्रतिपादन, लोकसहभागातून उभी राहिलेली शाळा पाहून गावकऱ्यांचे केले कौतुक




औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील जिल्हा परिषद शाळेने लोकसहभागातून केलेल्या कायापालटाची दखल घेत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शनिवारी ता. १५ शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या जिद्दीचे कौतुक करताना “आधुनिक भारताचे मॉडेल म्हणजे पिंपळदरी असल्याचे त्यांनी सांगितले. औंढा नागनाथ तालु्क्यातील पिंपळदरी येथे आज दिपके यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. यावेळी दिपके यांचा गावकऱ्यांच्या वतीने तसेच शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी शाळेची पाहणी केली. सदर शाळा गावकऱ्यांच्या सहभागातून कशी उभी राहिली याची माहिती बापुराव घोंगडे यांनी दिली. यावेळी बोलतांना दिपके म्हणाले की, जिथे सरकार मदत करण्यात अपयशी ठरले, तिथे पिंपळदरीच्या गावकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे जमा करून ही भव्य शाळा उभी केली आहे विशेषतः या कार्यात महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी महिलांचे विशेष आभार मानले. जर कोणाला शाळा कशी ठीक करावी हे शिकायचे असेल, तर त्यांनी ते पिंपळदरीच्या लोकांकडून शिकावे,” असेही ते म्हणाले शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांनी स्पॅनिश, फ्रेंच आणि जपानी अशा विविध परदेशी भाषांमध्ये केलेले स्वागत पाहून आपण थक्क झालो. ज्या गावात पोहोचायला चांगला रस्ता नाही किंवा मोबाईल नेटवर्क नाही, तिथे शिक्षणाचा उत्कृष्ठ दर्जा पहावयाला मिळणे हि मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, गावाच्या महिला सरपंच स्वतः अधिकाराने कारभार पाहत आहेत आणि त्यांचे पती किंवा भाऊ त्यांच्या जागी बसलेले नाहीत, ही बाब आधुनिक पिंपळदरीचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. पिंपळदरीच्या शाळा उभारणीत गावकऱ्यांचा लोकसहभागा व यशाची कथा केवळ देश पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय माध्यमांपर्यंत पोहोचविणार असल्याचेआश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. काही लोक आता शाळा उभी राहिल्यावर श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हे श्रेय केवळ कष्टकरी गावकऱ्यांचेच आहे आणि ते कोणालाही घेऊ देऊ नका असे त्यांनी ठणकावून सांगितले. या भेटीचे सर्व फोटो आणि व्हिडिओ कॉक्रोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम पेजवरून संपूर्ण जगाला दाखवले जाणार आहेत. येणाऱ्या काळात अनेक मोठ्या व्यक्तींना या शाळेची पाहणी करण्यासाठी पिंपळदरी येथे घेऊन येणार असल्याचेही दिपके यांनी यावेळी स्पष्ट केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🇮🇳 Happy Independence Day 🇮🇳