Diwali Lantern

'गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते':सोनिया गांधींचीही परवानगी होती, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; नेमके काय म्हणाले?




सध्या राज्यात आणि देशात भाजपचे मोठे राजकीय वर्चस्व असून सत्तेसाठी अनेक नेते व पक्ष सत्ताधाऱ्यांसोबत जाण्यास उत्सुक असल्याचे चित्र आहे. ज्याचा प्रत्यय नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदारांनी एकनाथ शिंदे गटात केलेल्या प्रवेशावरून आला. राजकारणातील याच बदलत्या संस्कृतीच्या आणि इतिहासाच्या चर्चांदरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते आणि त्याबाबतचे सर्व काही निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा हा पक्षप्रवेश का रद्द झाला, यामागची पडद्यामागची माहिती चव्हाण यांनी आता उघड केली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांनी मंत्री करण्याची अट घातली होती, मंत्रिपद द्या अन्यथा नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत, असेही त्यांनी सांगितल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सोनिया गांधी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या पक्षप्रवेशाला परवानगी दिली, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विरोधी पक्षातला खासदार आपल्याकडे घेऊन मंत्री करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने त्यांचा प्रवेश झाला नाही. या सर्व घडामोडी मी पंतप्रधानांकडे न जाता थेट सोनिया गांधी यांच्याकडे गेलो, याचा पश्चाताप होतो, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. ही देखील बातमी वाचा अमित शहा नालायक गृहमंत्री:सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता का? पृथ्वीराज चव्हाण संतापले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, मोदी सरकारला 2029 च्या निवडणुकीची खात्री नाही, मला खात्री आहे. 2029 मध्ये सत्ता बदल होणार हे नक्की. मात्र, यासाठी विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे असून केंद्र सरकारची घटका भरली आहे. अमित शहा हे आपल्या कार्यालयात येऊन बसत होते, मात्र संसदेत येत नव्हते. संसदेत मी 19 वर्षे काम केले आहे. अमित शहा यांनी जाहीर केले असते की आम्ही सभागृहात बोलणार आहोत तर आम्ही थांबलो असतो. सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता का? अमित शहा नालायक गृहमंत्री आहेत, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🇮🇳 Happy Independence Day 🇮🇳