आरोग्य सेवा क्षेत्रात लाखो नोकऱ्या:मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंटने 'हेल्थकेअर ॲडमिनिस्ट्रेशन' अभ्यासक्रम आणला




मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंट (MIRM) ने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ‘एमबीए इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन’ या नवीन अभ्यासक्रमाचा शुभारंभ केला आहे. भारतातील वेगाने वाढणाऱ्या आरोग्य सेवा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या लाखो नोकऱ्यांची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्र-शिक्षण परिषदेची (AICTE) मान्यता मिळाली आहे. संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉ. सरोजा अस्थाना यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी एमआयआरएमचे कार्यकारी संचालक डॉ. विलास फरांदे आणि प्रा. सुनील चव्हाण उपस्थित होते. डॉ. सरोजा अस्थाना यांनी सांगितले की, या अभ्यासक्रमानंतर वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होतील. हा पाठ्यक्रम रुग्णालय आणि फार्मा ऑपरेशन्स, मेड-टेक इनोव्हेशन, हेल्थकेअर ॲनालिटिक्स आणि धोरण या क्षेत्रांमध्ये व्यावहारिक कौशल्ये आणि सखोल ज्ञान विकसित करतो. कॉर्पोरेट रुग्णालये, उद्योग, स्वयंसेवी संस्था (NGOs) तसेच आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत नामांकित संस्थांमध्ये इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल. तसेच, नोकरी मिळवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. डॉ. विलास फरांदे यांनी माहिती दिली की, या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाची मान्यता आहे. वैद्यकीय क्षेत्रातील विविध पदवीधर यासाठी प्रवेश घेऊ शकतात. हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम माफक शुल्कात उपलब्ध असून, शासनाच्या विविध सवलती व शिष्यवृत्तीचा लाभही विद्यार्थ्यांना घेता येईल. प्रवेशाची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. संस्थेची १०० टक्के नोकरी देण्याची यशस्वी परंपरा असून ती यापुढेही कायम राहील, असे डॉ. फरांदे यांनी नमूद केले. अद्ययावत अभ्यासक्रम, तज्ज्ञ प्राध्यापक, औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांमार्फत मार्गदर्शन, इंटर्नशिप आणि नोकरीसाठी संपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य संस्थेकडून दिले जाते. सध्या आरोग्य सेवा क्षेत्र वेगाने विस्तारत असून, या क्षेत्रात कुशल व्यवस्थापन तज्ज्ञ मनुष्यबळाची मोठी आवश्यकता आहे, ज्यामुळे विविध संधी उपलब्ध होत आहेत. प्रा. सुनील चव्हाण यांनी सांगितले की, मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंट गेल्या १६ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या संस्थापिका डॉ. सरोजा अस्थाना या नोबेल पारितोषिक सहभाग विजेत्या असून, त्या उच्चशिक्षित अभियंता आहेत. त्यांनी आयआयटी खरगपूर येथून पीएचडी पदवी मिळवली आहे आणि एनसीएलमध्ये संशोधक म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहे. संस्थेच्या कॅम्पसमध्ये १०० खाटांचे आयव्ही लीफ आयुर्वेदिक रुग्णालय आहे. येथे गरजू व गरीब रुग्णांना माफक दरात रुग्णसेवा दिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *