Navodaya Vidyalaya Class 6 Admission Date Extended



पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मधील इयत्ता ६ वीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी (JNVST-2027) अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ ही होती, ती आता ०७ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य बी. सी. सरोज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

महत्त्वाचे तपशील:

परीक्षेची तारीख: शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६

नवी अंतिम मुदत: ०७ ऑगस्ट २०२६

अधिकृत संकेतस्थळ: navodaya.gov.in किंवा cbseitms.rcil.gov.in/nvs

पालकांनी व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावर उपलब्ध असलेले प्रॉस्पेक्टस (माहिती पुस्तिका) काळजीपूर्वक वाचून अचूक माहिती भरावी, असे आवाहन विद्यालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *