'स्वराज्य सेवा प्रतिष्ठान'ला सोमेश्वर पुसतकर लोकगौरव पुरस्कार:ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी सन्मानित, एक लाख रुपये प्रदान




दिवंगत सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा लोकगौरव पुरस्कार ‘स्वराज्य सेवा प्रतिष्ठान’ला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा रविवार, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर पुसतकर सभागृहात पार पडला. मराठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अविनाश आवलगावकर यांच्या हस्ते ‘स्वराज्य सेवा प्रतिष्ठान’च्या पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘वनराई’ चे विश्वस्त आणि माजी आमदार गिरीश गांधी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुळकर्णी आणि कृषी विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्रीराम काळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विदर्भातील ऐतिहासिक किल्ले, प्राचीन मंदिरे, शेकडो वर्षे जुन्या विहिरी आणि इतर ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्यासोबतच त्यांचा देदीप्यमान इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘स्वराज्य सेवा प्रतिष्ठान’ने मोठे कार्य केले आहे. या कार्यात त्यांनी शेकडो तरुणांना सहभागी करून घेतले आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे. कार्यक्रमाला पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रा. एम.टी. नाना देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे, गजलकार खलीश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *