पहिली घटना २९ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास माणिक पेट्रोल पंप, कर्मवीर नगर येथे घडली. रामा देवकर, साईनाथ गोरे आणि अक्षय मेटकर यांनी संगनमत करून फिर्यादी राजू सत्यम जायभाये (रा. गोविंद नगर) यांच्यावर “माझ्याकडे काय बघतोस” या कारणावरून वाद घालत लोखंडी रॉडने डोक्यावर व हातावर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि. शिंदे करीत आहेत.
दुसरी घटना ३१ जुलै रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास महेबुबिया कॉलनी परिसरात घडली. शेख आयान शेख अजीम, ओसामा आणि मोहम्मद रेहान यांनी संगनमत करून ऑटोसमोर गाडी लावत शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यानंतर फिर्यादीचा मुलगा सलमान याच्यावर चाकूने छाती व पाठीवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार जावेदखान खाजाखान (रा. खुदबईनगर, देगलूर नाका) यांनी दिली. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक देशमुख करीत आहेत.
