शिवनात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व पालकांचाही सन्मान


शिक्षणातून ज्ञान मिळवणं हे व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्याचे पहिलं पाऊल असतं आणि अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणं म्हणजे समाजा च्या उज्ज्वल भविष्यात हातभार लावणे होय,शिक्षण हे परिवर्तनाचे पहिले पाऊल असल्याचे मनोगत नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य निकिता काळे यांनी शिवना येथे केले.गुरुवारी दि. २६ एन. एम. एम एस (NMMS)शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा केंद्रातील प्रत्येक शाळेत पार पडला.यावेळी पालकांचाही सन्मान झाल्याने विद्यार्थ्यांचे मनोबल वाढणार आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत शिवना केंद्रातील ५९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यापैकी तब्बल ३२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन चार वर्षापर्यंत १२००० रुपये शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षणाचे शस्त्र पेन व वही देऊन जिल्हा परिषद सदस्या कु.निकिता काळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला व पालकांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.आमसरी,वाघेरा, खुपटा नवा वडाळी व शिवना येथिल एकूण ३२ विद्यार्थी शाळांनिहाय उत्तीर्ण झाले आहेत.शाळेच्या आवारात पालकांसमक्ष गौरव झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.यावेळी केंद्र प्रमुख नारायण भोंबे,सर्व शाळेचे मुख्याध्या पक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
ताई तुमचे शिक्षण काय? विद्यार्थी व पालक यांच्या सत्कारानंतर नुकतेच औषधनिर्माण शास्त्र(बि. फार्मसी )विषयात पदवी घेतली पण अचानक निवडणुक लढवण्याची वेळ आली. ती निवडणूक तेवीस वर्षीय कु.निकिता काळे यांनीं जिकंलीही. या वेळी पहिल्यांदाच विद्यार्थी व पालकांचा यथोचित सत्कार झाला, दरम्यान ताई तुम्ही किती शिकलात असे म्हणत मुलींनीही काळे यांचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *