होनवडज येथील शहाजीचा खून करणाऱ्या ज्ञानेश्वर जन्मठेप; १० हजार रुपयांचा दंड

नांदेड


मुखेड (प्रतिनिधी) – पैशांच्या वादातून मित्रावर चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला मुखेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि १०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय, मयताच्या आई-वडिलांना नुकसान भरपाई देण्याची शिफारस विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांच्याकडे करण्यात आली आहे.

घटना व पार्श्वभूमी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी तक्रारदार मोहन रावण जाधव यांनी पोलीस ठाणे मुखेड येथे फिर्याद दिली होती. २ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता आरोपी ज्ञानेश्वर प्रभाकर जाधव राहणार होनवडज हा मयत शहाजी मोहन जाधव याच्याकडे पैसे मागून वाद करत होता, तो वाद तक्रारदाराने मिटवला होता. दिवशी संध्याकाळी सुमारे ४:३० वाजता आरोपी ज्ञानेश्वर याने पुन्हा शहाजीसोबत वाद घालून त्याच्या मानेवर आणि छातीवर चाकूने वार केले. त्यामुळे शहाजी गंभीर जखमी झाला. मयताचे काका संभाजी जाधव व इतर साक्षीदारांनी त्यास प्रथम मुखेड येथील सरकारी दवाखान्यात आणले आणि त्यानंतर नांदेड येथील सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ३३/२०२२, कलम ३०२ भादवी अन्वये गुन्हा दाखल झाला. तत्कालीन पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. गोबाडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान न्यायालयात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय अहवाल, वैज्ञानिक प्रयोगशाळा अहवाल आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मुखेड न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. देशमुख यांनी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपी ज्ञानेश्वर प्रभाकर जाधव यास दोषी धरून कलम ३०२ भादवी अन्वये जन्मठेपेची शिक्षा व १०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सरकारी पक्ष या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन भिकाजी खिल्लारे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस कॉन्स्टेबल राऊबाई मधुकरराव गुडे आणि पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानोबा केंद्रे यांनी सहकार्य केले.

 


Post Views: 21










What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *