[ads1]
![]()
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना शनिवारी जामीन मंजूर झाला. दिपके यांना शुक्रवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. शुक्रवारी कनॉट प्लेस येथील ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीपूर्वी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आठ दिवसांत दिपके यांच्यावर झालेली ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी, १० ऑक्टोबर रोजी त्यांना दिल्ली विमानतळावर विमानातूनच ताब्यात घेण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, काँग्रेस १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर रॅली काढणार आहे. काँग्रेसने दिल्ली पोलिसांकडून आधीच परवानगी मिळवली आहे.
[ads2]
What do you feel about this post?
0%
Like
0%
Love
0%
Happy
0%
Haha
0%
Sad
0%