तुकाराम बीजेला गौतमी पाटीलच्या लावणीचा खटाखोप:वाढत्या विरोधामुळे वडूज पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत नाकारली परवानगी

0
db-temp-cover-marathi-86_1772806097.jpg




संत तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाचा स्मृती दिन. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या अभंगांचे स्मरण करण्याचा दिवस. याच दिवशी खटाव तालुक्यातील बनपुरी गावची यात्रा असते. त्यानिमित्त शुक्रवारी (६ मार्च) गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु, सामाजिक दबावामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली आणि तो कार्यक्रम अखेर रद्द करावा लागला आहे. तुकाराम बीजदिनी जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचे स्मरण केले जाते. उत्सव आणि दिंडी सोहळा आयोजित केला होता जातो. अशा दिवशी बनपुरी (ता. खटाव) गावची यात्रा भरते. सालाबादप्रमाणे यात्रा कमिटीने कुस्त्यांचे मैदान, बैलगाडी शर्यत, रक्तदान शिबीर, भारूडी भजन, ऑर्केस्ट्रा आणि गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शुक्रवारी (६ मार्च) गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, टीका आणि वाढत्या विरोधामुळे वडूज पोलिसांना ऐन कार्यक्रमाच्या दिवशी परवानगी नाकारावी लागली. वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सातेवाडी गावात पूर्वी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. लोकांनी गोंधळ घालून कार्यक्रम बंद पाडला होता. गौतमी आणि कलाकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. शुक्रवारी काही गावांत शिवजयंतीच्या मिरवणुका पार पडणार आहेत. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला संरक्षण देण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. तसेच महालक्ष्मी आधार फाऊंडेशनच्या प्रतिभा शेलार यांची तक्रार, या सर्व गोष्टी पाहता कार्यक्रमाला परवानगी नाकारत असल्याचे पत्र वडूजचे पोलिस निरीक्षक घन:शाम सोनवणे यांनी संयोजकांना दिले आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks