योजना:पीएम-किसान योजनेला केंद्राची 5 वर्ष मुदतवाढ




केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी शेतकरी, क्रीडा, स्वच्छ ऊर्जा आणि तेल-गॅस शोधाशी संबंधित ४ निर्णय घेतले. पीएम-किसान सन्मान निधी योजना २०३०-३१ पर्यंत वाढवली. पुढील ५ वर्षांत ३.१५ लाख कोटी रुपये खर्च केले जातील. पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपये ३ हप्त्यांत मिळत राहतील. खेलो इंडिया आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या मदतीसाठी २०२६-२७ ते २०३०-३१ पर्यंत ३६,४४१ कोटी रुपये मंजूर केले. तर पीएम-सूर्य सरोवर योजनेवर ५,०७० कोटी रुपये खर्च होणार आहेत. जलाशयांवर ५,००० मेगावॅटचे फ्लोटिंग सोलार प्लँट व १०,००० मेगावॅट प्रतितास साठवणूक क्षमता निर्माण केली जाईल. यामुळे १६ ते १७ हजार रोजगार मिळतील. समुद्रमंथन योजनेत ८४,०८४ कोटी रुपयांमधून तेल-गॅस सर्वेक्षण, विहिरींचे ड्रिलिंग व सामायिक सुविधा निर्माण केल्या जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *