Mumbai Homosexual Extortion Fake Kidnapping Case; Businessman Held CCTV Footage | समलैंगिक संबंधांचा नाद भोवला: अपहरणाचे प्रकरण पोहोचले पैसे उकळण्यापर्यंत; कापड व्यापारी करायला गेला एक झाले दुसरेच – Maharashtra News



समलैंगिक संबंधाच्या नादातून एका 66 वर्षीय कापड व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. हा व्यापारी समलैंगिक संबंधांच्या नादा आग्र्याला गेला. पण तिथे हे प्रकरण प्रथम अपहरण व नंतर पैसे उकळण्यापर्यंतच्या खोट्या गुन्ह्यापर्यंत गेले. पण पोलि

.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित 66 वर्षीय व्यावसायिकाचा महाराष्ट्रात कापडाचा व्यवसाय आहे. हा व्यक्ती गत काही दिवसापासून गे-डेटिंग अॅप वापरत होता. त्या माध्यमातून त्याची मैत्री काही पुरुषांशी झाली होती. या लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची मैत्री समलैंगिक संबंधांपर्यंत पोहोचली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी आग्र्यात एकमेकांना भेटण्याचे ठरवले. हा व्यावसायिक आनंदात तिथे पोहोचला. तेथील दरेसी परिसरातील हॉटेलमधील एक खोली त्यांनी बूक केली. तो व्यावसायिक त्या पुरुषांसोबत बाहेर फिरण्यास हाथरसला गेला. तिथेच या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

66 वर्षीय व्यक्ती व त्याच्या पुरुष मित्रांमध्ये कथितपणे वाद झाला. हा वाद एवढा टोकाला पोहोचला की, सदर पुरुषांनी त्या व्यक्तीकडून 1.20 लाख रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतली. एवढेच नव्हे तर त्याची अंगठी व मोबाईल फोनही हिसकावून घेण्यात आला. यामुळे कापड व्यावसायिक प्रचंड हादरला. भीती, बदनामी व प्रकरण आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची शक्यता, यामुळे त्याला चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आले. तो आग्र्याला परतला आणि रात्री उशिरा एत्माद्दौला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचला. त्याने आपल्यासोबत लुटमार झाल्याची तक्रार नोंदवली.

संपूर्ण प्रकरणच निघाले बोगस

तो म्हणाला, काही अज्ञात लोकांनी त्याचे अपह्रण केले. त्याच्याकडून पैसे मिळाल्यानंतर त्याला सोडून दिले. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी वृद्ध थांबलेल्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही खंगाळले. त्यात पीडित व्यावसायिक स्वतःहून आरोपींसोबत जात असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी तक्रारदार व्यक्तीने ज्या लोकांविरोधात तक्रार नोंदवली होती, त्यांची चौकशी केली. त्यांचे बँक व्यवहार तपासले. यामुळे पोलिसांना तक्रारदारावर संशय बळावला. त्यानंतर त्यांनी त्याची चौकशी केली.

अखेर वृद्धाने नेमके काय घडले? याचा पाढा पोलिसांपुढे वाचला. पोलिसांनी सांगितले की, त्या व्यावसायिकाने मोबाईल अॅपद्वारे काही पुरुषांशी मैत्री केली होती. त्या मैत्रीचे समलैंगिक संबंधांत रुपांतर झाले. हे अपहरणाचे प्रकरण नसून, समलैंगिक संबंध, वाद व बदनामीच्या भितीने रचलेले कुभांड आहे. पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करत व्यावसायिकासह 5 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच ज्या बँक खात्यात 1.20 लाख रुपये ट्रान्सफर झाले ते खातेही गोठवले आहे. आता या सर्व आरोपींविरोधात कारवाई केली जात आहे. प्रस्तुत प्रकरणात कुणाचीही फसवणूक झाली नाही. केवळ वैयक्तिक वाद व बदनामीच्या भितीने अपहरण व लुटीचा खोटा प्रकार उभा करण्यात आला, असे पोलिसांनी या प्रकरणी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *