​स्मार्ट मीटर आणि सौर ऊर्जेवरील अवाजवी कर रद्द करा:हिंगोलीत सर्वपक्षीय बैठकीत मागणी, मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन




महावितरण कंपनीतर्फे ग्राहकांची कोणतीही संमती न घेता, त्यांच्या घरातील सुस्थितीतील आणि चालू असलेले जुने वीज मीटर काढून त्याऐवजी ‘स्मार्ट मीटर’ सक्तीने बसवले जात आहेत. स्मार्ट मिटर सक्ती तात्काळ थांबवण्यात यावी, तसेच सौर ऊर्जेवर (सोलार) लावलेले अवाजवी आणि अनावश्यक कर तात्काळ रद्द करण्यात यावेत, अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली आहे ​​या संदर्भात ‘श्री गणेश इन’ येथे हिंगोलीतील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महावितरणच्या मनमानी कारभारावर उपस्थितांनी तीव्र संताप व्यक्त केला. ​निवेदनातील मुख्य मागण्या कोणत्या? या संदर्भात गुरुवारी, ३० जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांच्या नावे हिंगोली महावितरणचे अधिक्षक अभियंता यांना एक निवेदन देण्यात येणार आहे. ११ ऑगस्टला मोर्चा काढण्याचा इशारा महावितरण प्रशासनाला आणि राज्य शासनाला प्रशासकीय निवेदनाद्वारे ११ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात येणार आहे. या कालावधीत ग्राहकांच्या न्याय्य मागण्या मान्य न झाल्यास, ११ ऑगस्ट रोजी हिंगोलीतील वीज वितरण कार्यालयावर प्रचंड धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. ​या बैठकीला हिंगोली शहरातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नागरिक आणि मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते. ३० जुलै रोजी महावितरण कार्यालयावर निवेदन देण्यासाठी परिसरातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही या बैठकीतून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *