![]()
मनपा निवडणुकीत अवघ्या दोनच जागा जिंकणाऱ्या काँग्रेसमध्ये आता पराभवानंतरचे कवित्व सुरू झाले आहे. आत्मचिंतनासाठी खासदार प्रणिती शिंदे व प्रभारी मोहन जोशी यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी नेतृत्वावरील राग जाहीरपणे व्यक्त केला. प्रणिती शिंदे यांनी बळ दिले नाही, अशी उमेदवारांची तक्रार होती पण त्यांच्यावर थेट टीका करण्याचे धाडस कुणीही दाखवले नाही. त्या ऐवजी नगरसेवकपदी निवडून आलेल्या शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना टार्गेट करून राग व्यक्त केला. प्रभाग 22 मधून माजी महापौर संजय हेमगड्डी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांची पत्नी राजनंदिनी, ब्लॉक अध्यक्ष गायकवाड यांचा मुलगा शीतल यांनी निवडणूक लढविली. या प्रभागात काँग्रेसच्या चौघांचाही पराभव झाला. तेथे ‘एमआयएम’ने दुसऱ्या क्रमांकाची मिळवली. याबद्दल हेमगड्डी म्हणाले, ‘शहराध्यक्ष चेतन नरोटे स्वत: उमेदवार होते. त्यामुळे इतर प्रभागाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यांनी निवडणुकीपुरते तरी प्रभारी नेमून त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवणे गरजेचे होते. यापूर्वी 1999 मध्ये शहराध्यक्ष प्रकाश यलगुवार यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी डॉ. पुंजाल यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपद सोपवले होते. 2002 मध्ये ॲड. यू. एन. बेरिया यांनीही हेच केले होते. तेव्हा पक्षाला यश मिळाले. पण नरोटेंनी सर्व अधिकार स्वत:कडे ठेवले. त्यामुळे इतर उमेदवारांपर्यंत यंत्रणा पोहोचलीच नाही. प्रचाराचे नियोजन आम्हालाच करावे लागले. मलाही पॅनेल सोडून एकटा निवडून येणे सहज शक्य होते. पण, मी चौघांसाठी लढलो.’ माझा राजीनामा घ्या, पक्षाची पुनर्रचना करा- गणेश डोंगरे नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी पक्षाच्या सर्वच विभागांची पुनर्रचना करा. पराभावाची नैतिकता स्वीकारून युवक काँग्रेस शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मी स्वत:पासून त्याची सुरुवात करतो, अशी भूमिका युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी मांडली. ब्लॉक अध्यक्ष गायकवाड यांच्यासह इतर उमेदवारांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली. क्रमांकाची मिळवली. याबद्दल हेमगड्डी म्हणाले, ‘शहराध्यक्ष चेतन नरोटे स्वत: उमेदवार होते. त्यामुळे इतर प्रभागाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यांनी निवडणुकीपुरते तरी प्रभारी नेमून त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवणे गरजेचे होते. यापूर्वी 1999 मध्ये शहराध्यक्ष प्रकाश यलगुवार यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी डॉ. पुंजाल यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपद सोपवले होते. 2002 मध्ये ॲड. यू. एन. बेरिया यांनीही हेच केले होते. तेव्हा पक्षाला यश मिळाले. पण नरोटेंनी सर्व अधिकार स्वत:कडे ठेवले. त्यामुळे इतर उमेदवारांपर्यंत यंत्रणा पोहोचलीच नाही. प्रचाराचे नियोजन आम्हालाच करावे लागले. मलाही पॅनेल सोडून एकटा निवडून येणे सहज शक्य होते. पण, मी चौघांसाठी लढलो.’ स्वत:च्या चुकांचे खापर दुसऱ्यावर नको- नरोटे टीकेला उत्तर देताना नरोटे म्हणाले, ‘स्वत:च्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा आत्मचिंतन करावे. निवडणूक काळात सातत्याने बैठका सुुरू होत्या. स्वत: शिंदेसाहेब, प्रणितीताई सोलापुरात होत्या, त्यावेळी प्रभारी नेमण्याबाबत किंवा पदभार देण्याबाबत ते काहीच बोलले नाही अन् आता दुसऱ्याकडे बोट दाखविणे योग्य नाही.’ टीका करणाऱ्यांनी घरी बसावे- प्रणिती शिंदे पक्षविरोधकांची गय करणार नाही. पक्षावर टीका करणाऱ्यांनी घरी बसावे, अशा शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी खडेबोल सुनावले. यापुढे मैदानात उतरून लढणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिक ताकद दिली जाईल. पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात येईल. पराभव झाला तरी उमेदवारांनी शॅडो नगरसेवक म्हणून जनतेच्या अडचणी सोडवाव्यात,’ असेही त्या म्हणाल्या. तर भाजप नव्हे ईव्हीएम निवडून आल्याची टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.
सोलापुरात पराभूत काँग्रेसमध्ये भडका; विजयी चेतन नरोटे टार्गेट:शहराध्यक्षांचे स्वत:च्या प्रभागातच लक्ष, इतर उमेदवारांकडे दुर्लक्ष
