पवित्र रमजान महिन्यात नागरी सुविधा पुरविण्यासाठी धर्माबाद प्रशासन सज्ज व्हावे – म. मुबशिर


धर्माबाद-१९ फेब्रुवारी पासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत आहे.मुस्लिम धर्मामध्ये मोठ्या उत्साहाने रमजान महिना साजरा केला जातो या महिन्यात मुस्लिम धर्मातील पुरुष,महिला, व लहान  मुले ,मुली उपवास ठेवतात यासाठी घरातील महिला पहाटे ३:३० वाजता उठतात व सहेरी साठी जेवण तयार करतात तसेच सायंकाळी ४ वाजल्यापासून उपवास सोडण्यासाठीची तयारी करतात म्हणून धर्माबाद नगर पालिका प्रशासन सज्ज व्हावे त्यात नगर पलिकाने शहराला होणारा पाणी पुरवठा नियमित करावा सर्व प्रभागात फोगिंग करावे अनेक ठिकाणी नाल्या तुडुंब जात आहे.नाली सफाई साठी कर्मचारी येत नाही.तात्काळ नाली सफाई करावी.शहरातील मस्जिदे समोरील परिसर स्वच्छ करावे,ज्या भागातील विद्युत खांबावरील विद्युत दिवे बंद असतील ते सर्व विद्युत दिवे सुरू करावे.तसेच महावितरण कंपनीने देखील या महिन्याचा मान ठेवत वारंवार होत असलेले विद्युत पुरवठ्याचा लपंडाव थांबवावा व उच्च दाबाने विद्युत पुरवठा करावा. मेंटनेसच्या नावाखाली पूर्ण दिवस बंद ठेवून
नाहक त्रास टाळावे.अशी. मागणी सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार म. मुबशिर यांनी केली आहे.

धर्माबाद शहरात अनेक प्रभागात नाली सफाई न झाल्यामुळे डासांचा प्रभाव वाढत आहे.त्यामुळे मलेरिया व डेंग्यू असे सारथी रोगांना आमंत्रण मिळत आहे. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.तसेच शहरात खंब्यावरील पथ दिवे बंद असून तो बदलण्यात यावे व वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा.तातडीने नगर पालिका प्रशासन नाली सफाई स्वच्छ्ता करून रमजानच्या पवित्र महिन्यात नागरिकांना दिलासा द्यावा.

Post Views: 11






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks