मुली, महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना आणि कायद्याची जाण असावी:वासूद येथे महिला सक्षमीकरण व न्यायाची उपलब्धता विषयावर कायदेविषयक शिबीर‎




मुली व महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. मुली, महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना व कायद्याची जाण असावी, असे प्रतिपादन न्यायाधीश ए.ए.पाटील यांनी केले. ते वासूद येथील कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाकरीता सांगोला विधिज्ञ संघाचे उपाध्यक्ष ॲड. एस.बी.दिवसे, विधिज्ञ संघाच्या महिला प्रतिनिधी ॲड. एस. व्ही. बोत्रे, सांगोला विधिज्ञ संघाच्या महिला सदस्या ॲड. एच. डी. मेनकुदळे, सांगोला विधिज्ञ संघाच्या महिला सदस्या ॲड. एन.एम.जवंजाळ, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. या कायदेविषयक शिबिराचा मुख्य उद्देश महिला व मुलींचे सक्षमीकरण हा होता. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी आदेशित केल्याप्रमाणे बेटी बचाओ, बेटी पढाओ ही संकल्पना घेवून या विशेष कायदेविषयक शिबिराचे आयोजन करणेत आले होते. या शिबिरातील पहिला विषय बेटी बचाओ, बेटी पढाओ हा होता. या विषयावर सांगोला विधिज्ञ संघाच्या महिला सदस्या ॲड. एच.डी.मेनकुदळे – घोंगडे यांनी मार्गदर्शन केले. आपले मार्गदर्शनपर भाषणात ॲड. एच.डी.मेनकुदळे- घोंगडे यांनी अनेक उदाहरणांचा संदर्भ देताना बेटी बचाओ, बेटी पढाओ याचे महत्व उपस्थितांना समजावून सांगितले. आपले अध्यक्षीय भाषणात आपले विचार व्यक्त करताना सह दिवाणी न्यायाधीश ए.ए.पाटील साो, यांनी मुली व महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. मुलगी शिकली, प्रगती झाली याचे महत्व त्यांनी त्यांनी अध्यक्षीय भाषणातून सर्वांना समजावून सांगितले. तसेच मुली व महिला सक्षमीकरणाकरीता बनविणेत आलेले अनेक कायदे, अनेक शासकीय योजना व त्यांची उपयोगिता ही उदाहरणासह सर्वांना अतिशय प्रभावीपणे कळवून दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांगोला विधिज्ञ संघाचे सदस्य ॲड. जी.एम.खटाकळे यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षकडी.टी. घोरपडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करणेकरीता सांगोला न्यायालयाचे अधीक्षक ए. एस. बमनळ्ळी, सहा अधीक्षक डी. डी. मायभाटे, विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक डी.एम.डोईफोडे, पी.एल.व्ही. पी.एच.पवार व सरदार शामराव लिगाडे विद्यालय व भाई जगन्नाथराव लिगाडे ज्यूनिअर कॉलेज, पर्यवेक्षक व्यवहारे तसेच संस्थेमधील सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर यांनी परिश्रम घेतले. या शिबिरातील दुसरा विषय सुकन्या समृध्दी योजना हा होता. या विषयावर सांगोला पोस्ट ऑफिस मधील डी.एम. इंगळे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. आपले मार्गदर्शनपर भाषणात महिला सक्षमीकरणाकरीता भारतीय पोस्ट विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सुकन्या समृध्दी योजना तसेच पोस्ट विभागातील इतर सर्व योजनांची माहिती सादर केली. या शिबिरातील तिसरा व महत्वाचा विषय मुलींना सक्षमीकरण व न्यायाची उपलब्धता हा होता. महिला सक्षमीकरण व संरक्षणाकरीता तयार करणेत आलेले अनेक कायदे, कायद्यांची निर्मिती, कायद्याची गरज, अंमलबजावणी व दैनंदिन जीवनात होणारे अनेक फायदे याचे महत्व समजावून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *