नांदेड शहरात साडे दहा लाखांची जबरी चोरी;किनवट तालुक्यात घर फोडले


नांदेड (प्रतिनिधी)-  दिनांक 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता नांदेड येथील जुना मोंढा परिसरातील आरबुदा ट्रेडिंग कार्यालयात तिघा अनोळखी इसमांनी धाडसी चोरी केली. फिर्यादी सोहनलाल मोंतीलालजी परमार (वय 40, रा. तरोपंती भवन, नेहरू रोड, जालना) हे कार्यालयात असताना आरोपींनी ऑफिसमध्ये घुसून खंजराचा धाक दाखवला व त्यांच्या जवळील ₹10,50,000/- रकमेची बॅग जबरदस्तीने चोरून नेली.

 

फिर्यादीच्या तक्रारीवरून वजीराबाद पोलिसांनी गु. र. नं. 139/2026 कलम 309(4), 3(5) बीएनएस–2023 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि राजू वटाणे यांच्याकडे असून पोलिसांनी सदर गुन्ह्याचा उलगडा केला असल्याचे माहितीवरून समजते. आरोपींच्या अटकेसाठी तसेच मुद्देमालाच्या शोधासाठी पुढील तपास सुरू आहे.

किनवट मध्ये  घरफोडी

 

किनवट तालुक्यातील दिघडी मंगाबोडी  येथे 30 मार्च 2026 रोजी दुपारी 12.30 वाजेपासून ते 31 मार्च रोजी सकाळी 6 वाजेदरम्यान घरफोडीची घटना घडली. उध्दवराव नामदेवराव गुट्टे (वय 65) यांच्या घराचा कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून ₹70,000/- नगदी व सुमारे ₹40,000/- किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ₹1,10,000/- चा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.

 

फिर्यादीच्या माहितीनुसार किनवट पोलिसांनी गु. र. नं. 64/2026 कलम 331(4), 305(अ) बीएनएस–2023 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दोन्ही घटनांमुळे संबंधित परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध वेगात सुरू केला आहे.किनवट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सहायक पोल्सी निरीक्षक जाधव करीत आहेत.


Post Views: 61






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks