![]()
नशिराबाद जळगाव खुर्द येथे ३३/११ के.व्ही. क्षमतेच्या नवीन वीज उपकेंद्रामुळे शेतकऱ्यांना दिवसा सलग ८ तास तर ग्रामस्थांना २४ तास वीज मिळणार आहे. त्यामुळे हे उपकेंद्र शेतकरी व ग्रामस्थांसाठी वरदान ठरेल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देतानाच शेती पाणंद रस्त्यांना प्राधान्य देणार असल्याची माहिती दिली. अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ होत्या. एआयआयबी योजनेत जिल्ह्यात ३५ नवीन वीज उपकेंद्रे, १२२६ नवीन ट्रान्स्फॉर्मर, ३० केव्ही व ११ केव्ही लाइन (बंद केबल) तसेच सिव्हिल कामांसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली आहे. जळगाव खुर्द येथे भिल्ल समाजासाठी १५ लाख रुपयांचे समाजमंदिर, तर खिरडी येथे हनुमान मंदिर परिसरात बांधकाम मंजूर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री कृषी सौर योजनेत वीज वितरण कंपनीने मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन केले. कॉन्ट्रॅक्टरांनी काम ठरलेल्या मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे. कामात निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. वीज उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, विष्णू भंगाळे व मान्यवर. कार्यक्रमास यांची होती प्रमुख उपस्थिती इन्फ्राचे अधीक्षक अभियंता मनोज विश्वासे, वीज वितरण कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, नशिराबाद नगराध्यक्ष पिंटू पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, अभियंता पवन वाघुळदे, नगरसेवक लालचंद पाटील, उपसरपंच दिनेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जळगाव तालुक्यात मंजूर झालेली कामे शिरसोली व जळगाव खुर्द येथे २ नवीन उपकेंद्रे (५ कोटी रुपये), भादली बुद्रुक येथे अतिरिक्त रोहित्र (२ कोटी रुपये), ५५ गावांमध्ये १००/२०० केव्हीए नवीन रोहित्र (२.५० कोटी रुपये), २४ ठिकाणी रोहित्र क्षमता वाढ (१ कोटी रुपये), १० ठिकाणी शेती पंप व गावठाण वीज वाहिनी विलगीकरण (१३.५६ कोटी).
जळगाव खुर्दच्या शेतकऱ्यांना सलग आठ तास वीज:33/11 के.व्ही.चे नवीन वीज उपकेंद्र, ग्रामस्थांसाठी 24 तास वीजपुरवठा
