अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात पोहोचला रणवीर सिंह:आमिर खान पत्नी गौरीसोबत दिसले, कृती सेनन-गौरी खानही पोहोचल्या

मनोरंजन




मुंबईत शनिवारी संध्याकाळी अंबानी कुटुंबाने नवरात्रीपूर्वी ‘देवी शक्ती’ उत्सवाचे आयोजन केले. स्वदेश इरॉसला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात रणवीर सिंह, कृती सॅनन, आमिर खान यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सहभाग घेतला. स्वदेश इरॉस हे रिलायन्स रिटेलचे एक प्रमुख लक्झरी स्टोअर आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, पारंपरिक कला, हस्तकला आणि स्थानिक कारागिरांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी व ते प्रदर्शित करण्यासाठी हे स्टोअर सुरू करण्यात आले. कार्यक्रमात भारतीय हस्तकला, सांस्कृतिक परंपरा आणि सणाच्या शुभ भावनेचा उत्सव साजरा करण्यात आला. पाहुण्यांना भारतातील पारंपरिक कला आणि त्या जिवंत ठेवणाऱ्या कारागिरांची झलकही पाहायला मिळाली. अंबानी कुटुंबातील सर्व सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते. यामध्ये नीता अंबानी, मुकेश अंबानी, त्यांचे मुले आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांचा समावेश होता. सुना श्लोका मेहता आणि राधिका मर्चंट यादेखील कार्यक्रमाला पोहोचल्या. नीता अंबानी यांनी सोन्याच्या जरीकामाची आणि डिझाइनदार बॉर्डर असलेली मॅजेंटा-पिंक सिल्क साडी नेसली होती. त्यांनी ही साडी भारी भरतकाम केलेल्या ब्लाउज, खास दागिने, टिकली आणि कानातल्यांसोबत परिधान केली. मुकेश अंबानी यांनी ब्लॅक बंधगला परिधान केला होता. गुलाबी पॉकेट स्क्वेअरसोबत त्यांनी आपल्या लूकमध्ये हलका रंग आणला. बॉलिवूड कलाकारांनी वाढवली रंगत कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही सहभागी झाले. समारंभात आमिर खान आपल्या जोडीदार गौरी स्प्रॅटसोबत पोहोचले. तर गौरी खान, महीप कपूर आणि भावना पांडे यांनी एकत्र प्रवेश केला. याशिवाय अदिती राव हैदरी आणि जॅकलिन फर्नांडिस यांचीदेखील उपस्थिती होती. कारागीर आणि पारंपरिक कलांचा सन्मान संध्याकाळचे मुख्य आकर्षण स्वदेश इरोस येथे आयोजित ‘देवी शक्ती’ समारंभ ठरला. यामध्ये नवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व भारताच्या वैविध्यपूर्ण हस्तकला वारशाशी जोडण्यात आले. स्वदेश इरोसचे एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्या कारागिरांचा सन्मान करण्यात आला, जे आपल्या मेहनतीने, कौशल्याने आणि सर्जनशीलतेने देशाच्या पारंपरिक कलांना जिवंत ठेवत आहेत. पाहुण्यांना भारतातील प्रसिद्ध कलांमागील बारकाईची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. यासाठी कालीघाट चित्रकला, कलमकारी आणि अशावली विणकामाचे थेट प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या प्रात्यक्षिकांमध्ये या कलांसाठी आवश्यक अचूकता, संयम आणि कौशल्य दाखवण्यात आले. पाहुण्यांनी पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या या कारागिरीची जवळून ओळख करून घेतली. कार्यक्रमात लिमिटेड-एडिशन कलमकारीचे विशेष प्रदर्शनही भरवण्यात आले. यामुळे या पारंपरिक कलेचे सौंदर्य अधोरेखित झाले.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *