नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात सध्या LPG/ CNG आणि घरगुती गॅसची टंचाई गंभीर बनली असून ऑटो चालकाना आपली उपजीविका करण्यासाठी ना घरगुती गॅस मिळत नाही व व्यवसाय करण्यासाठी वाहनात गॅस इंधन मिळत नसल्याने ऑटो चालकांची दोन्ही बाजूंनी कोंडी होत असून प्रत्येक ऑटो चालक हा अर्धमेला झालेला आहे. त्यांच्याकडे प्रशासनासहित लोकप्रतिनिधीं ढुंगूनही पाहत नसल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत अशी जळजळीत टीका जयहिंद ऑटो सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद साजिदराज यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड जिल्ह्यात व महाराष्ट्रात ऑटो चालकांच्या अडीअडचणी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी जयहिंद ऑटो सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ मोहम्मद आरीफखान पठाण यांनी गेल्यावर्षी एनजीओ अंतर्गत ऑटो संघटना स्थापन करून ऑटो चालकाना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरातील सर्व ऑटो चालकाना शिस्त लावणे. ड्रेस मोफत उपलब्ध करून देणे. दरवर्षी इन्शुरन्स फिटनेस करीता कर्ज देणे. तसेच ऑटो चालकांच्या पत्नी व मुलींना मोफत शिवणकला आणि एमब्रायडरी ट्रेनिंग देणे असे विविध प्रकारच्या मोफत लाभ देण्यासाठी आमची संघटना प्रयत्नशील आहे असे डॉ मोहम्मद आरीफखान पठाण यांनी स्पष्ट केले आहे. आज रोजी पठाण यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर आणि जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड.खासदार रवींद्र चव्हाण.आमदार आनंद बोंढारकर.माजी महापौर अब्दुल सत्तार.यांना समक्ष भेटून जयहिंद ऑटो सेनेचे पदाधिकारी यांनी आपली व्यथा मांडली आहे.
3 गॅस वितरकाकडून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा रक्कम आकारली जात आहे. तसेच दिवसभर दोन दोन किलोमीटर रांग लावून उन्हातानात उभे रहावे लागत आहे. यामुळे उन्हाची तीव्रता पाहता एखादा ऑटो चालकसोबत अनुचित घटना घडल्यास कोण जबाबदार राहतील. शहरातील तिरंगा चौक वजिराबाद. हिंगोली गेट. वाजेगांव नाका. जुना कौठा व खडकूत पाटी. दीप नगर. या LPG गॅस वितरकरावर आरोप करण्यात आली आहेत. नमूद केलेल्या गॅस एजन्सीकडून वारंवार Not stock असे फलक लावले जात आहे. जेंव्हा गॅस भरलेला टँकर पुढेच असतो. वितरण सुरू असले तरी पुरवठा अपुरा असल्याचे एजन्सी धारक उत्तर देतात. दररोज बदलणारे दर आणि अतिरिक्त आकारणीमुळे ऑटो चालक सहित नागरिकांची कंबर मोडीत आहे. यामुळे आर्थिक अडचण वाढत असल्याची भावना सर्व ऑटो चालकांनी किरण अंबेकर यांच्या समोर हकीकत सांगितली आहे. यामुळे अंबेकर साहेब यांनी आश्वासन दिले की अन्याय कोणावरही होणार नाही. याबद्दल आम्ही शासनास कळवू असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान LPG गॅसचे दर 60 रुपयावरून थेट 100 रुपये किलो करण्यात आले आहे. तरीही पूर्णपणे गॅस मिळत नसल्याची ओरड होत असून गॅस पंप चालकांची मनमानी पद्धतीने ऑटो चालकाना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. यावर पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे. गॅस आवक आणि जावाकची नोंदणी तपासून पाहणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे पंप चालकांच्या मनमानीवर नियंत्रण मिळेल अशी वाच्यता जयहिंद ऑटो सेनेचे सर्व सदस्य. पदाधिकारी
ऑटो चालक. मालक. आपली उपस्थिती दर्शवून सहभाग नोंदवला आहे.
ऑटो चालक मालक हा शहरातील प्रवासी वाहतूकीचा मुख्य कना असतो. जी शहराची आण. बान. आणि शान असते. जो इतर जिल्हे अथवा राज्यातून प्रवासी एसटीबस. ट्रॅव्हल्स. रेल्वे. विमानाने उतरताच तो घरी हवेत उडून जात नाहीत तर तो ऑटोमध्ये बसूनच आपल्या घरापर्यंत सुखरूप पोहचतो. आणि emargancy व hispital मध्ये वेळेवर सेवा देणारा म्हणजे ऑटो चालक आहे. यामुळे आम्ही सर्व ऑटो चालकाना विनंती करतो की त्यांनी आपली ओळख ड्रेस कोड वरूनच होते याची काळजी घेणे. प्रवाशांशी सौजन्याने वागावे. थोड्या थोडक्यासाठी भांडण तंटे पासून दूर राहणे. प्रवाशी उतरल्यावर त्यांच्या सामानवर काळजी पुर्वक लक्ष देणे. कोणी सामान. बॅग. अथवा कोणती वस्तू सापडले असल्यास कार्यालयात आणून जमा करणे. कारण प्रवासी हाच आपला स्रोत असतो आणि ग्राहक म्हणजे एक देवदूत असतो. ज्यामुळे त्यांच्या गरजा आपण पूर्ण करतो तर आपली गरज प्रवाश्यांच्या माध्यमातून होते याचे भान ठेवून ऑटो चालकांनी ग्राहकांना सुलभ कसे होईल याची काटेकोरपने पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन जयहिंद ऑटो सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ मोहम्मद आरीफखान पठाण व जिल्हाध्यक्ष मोहम्मद साजिदराज यांनी केले आहे.