नांदेड (प्रतिनिधी) – गेली आठ वर्षापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्यावतीने भव्य अशा बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले जाते ह्याही वर्षी सोनारी फाटा तालुका हिमायतनगर येथे बौध्द धम्म परिषद मोठ्या थाटात संपन्न झाली दरवर्षी ह्या धम्म परिषदेमध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते यंदा ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध क्षेञा मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवराचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव 2026 चा पुरस्कार प्रभू सटवाजी सावंत यांना मान्यवराच्या हास्ते प्रदान करण्यात आला आहे.
प्रभू सावंत हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून त्यांनी केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम केले आहे , तसेच विविध शिक्षक संघटनांमध्ये कार्यरत राहून समाजातील वंचित व शोषित घटकांसाठी संघर्ष केला आहे. त्यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सचिव ते प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे त्यांच्या नेतृत्वात अनेक सकारात्मक सामाजिक चळवळींना गती मिळाली.
दिनांक 29 मार्च रोजी येथे भव्य बौद्ध धम्म परिषदे मध्ये प्रभू सावंत यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार दिला आहे.
प्रभु सावंत यांना हा पुरस्कार मिळताच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष देविदास बस्वदे प्रा. अविनाश नाईक युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सोनकांबळे कनिष्क सोनसळे अंकुश कुमार चित्ते गंगाधर ओडणे उत्तम मांडणीकर मायाभाऊ नांदेडकर बि. झेड. पवार आदिने त्यांचे अभिनंदन केले आहे.
Post Views: 200
