Mumbai MNS Candidates Final; Bala Nandgaonkar Sardesai Meet Raj Thackeray, AB Forms From Tomorrow | मनसेचे मुंबईतील उमेदवार ठरले: बाळा नांदगावकर, सरदेसाई बंद लिफाफा घेऊन राज ठाकरेंच्या घरी; उद्यापासून AB फॉर्मचे वाटप – Maharashtra News


राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील आपल्या उमेदवारांची नावे फायनल केली आहेत. उमेदवारांच्या नावांचा बंद लिफाफा घेऊन मनसे नेते बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई राज ठाकरे यांच्या घरी पोहोचलेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसे उ

.

मनसे व ठाकरे गटाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आज सकाळपासून सुरू होती. या बैठकीत मुंबईतील जागावाटप व उमेदवारांची नावे जवळपास फायनल झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर मनसे नेते नितीन सरदेसाई व बाळा नांदगावकर हे दोन्ही नेते एक बंद लिफाफा घेऊन राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेत. या बंद लिफाफ्यात मनसे उमेदवाराची यादी असल्याचा दावा केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसे आज रात्रीपासूनच आपल्या उमेदवारांना योग्य ते संदेश पाठवेल. त्यानंतर उद्या सकाळपासून सर्व उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले जाईल. तूर्त राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेच्या उमेदवारांच्या नावांवर शेवटचा हात फिरवला जाईल.

दादरची जागा मनसेच्या वाट्याला?

दुसरीकडे, ठाकरे गटासोबतच्या जागावाटपाच्या चर्चेत दादर वॉर्ड कर्मांक 192 ची जागा मनसेला सुटल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी मनसे नेते यशवंत किल्लेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी माहिती आहे. 2017 च्या निवडणुकीत या वॉर्डातून ठाकरे गटाच्या प्रती पाटणकर विजयी झाल्या होत्या. पण आता वाटाघाटीत हा वॉर्ड मनसेच्या ताब्यात घेतल्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे.

ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी याविषयी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त करणार आहेत. यात माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांचाही समावेश आहे.

महायुतीचे उद्या जागावाटप

दुसरीकडे, सत्ताधारी भाजप व शिवसेनेचे जागावाटप उद्या होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली जाईल. या प्रकरणी आज रात्री शिवसेना समन्वय समितीच्या नेत्यांची एक बैठक एकनाथ शिंदे यांच्यासोबत होईल. या बैठकीत शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागांवरील उमेदवार निश्चित केले जातील. त्यानंतर या उमेदवारांना उद्यापासूनच एबी फॉर्मचे वाटप केले जाण्याची शक्यता आहे. पक्षातील संभाव्य बंडखोरी टालण्यासाठी उमेदवारी शेवटच्या क्षणी जाहीर केली जाणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

हे ही वाचा…

इथे कुणाच्याही बापाची कायमस्वरुपी सत्ता नाही:विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात; संधी सर्वांना मिळते म्हणत दिला सूचक इशारा

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी राज्य व केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली. निवडणुकीच्या तोंडावर आमच्या उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्याचा व मारहाण झाल्याचा प्रयत्न झाला. आज तुमची सत्ता आहे म्हणून तुम्हाला मस्ती आली आहे. आज तुमचा दिवस आहे. उद्या आमचा येील. इथे कुणाच्याही बापाची कायमस्वरुपी सत्ता नाही. सत्तेचा मुकूट कायम बदलत असतो हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *