विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई, गोदी मीडिया सारख्या प्रसिद्धीमुळे झालेल्या आरोपांना उत्तर देण्याची गरज


नवीन नांदेड (प्रतिनिधी)-  ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्कंड शिवारात अवैध वाळू उत्खननाविरोधात विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने कारवाई केल्याची माबातमी प्रसिद्ध झाल्यानंतर नांदेडमध्ये सुद्धा गोदी मीडिया अवतरला आणि केलेल्या कार्यवाहीला संशयात आणण्याचा प्रयत्न झाला.

काही माध्यमांमध्ये या प्रकरणाची वेगळी बाजू मांडण्यात आली असून, कारवाईच्या प्रसिद्धीवरून चर्चेला उधाण आले आहे. काही ठिकाणी या प्रकाराला आयत्या पिठावर रेघोट्या  असे संबोधत कारवाईवर शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. तथापि, पोलीस पथकाने केलेल्या कामाबाबत आम्ही काम बोलते, आरोप नाहीत  तसेच  खरे सोने अग्नीतही चमकते अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहोत.

दिसणाऱ्या छायाचित्रात, या ठिकाणी वाळूचा साठा ज्या पद्धतीने आढळून आला आहे, त्यावरूनही काही प्रश्न उपस्थित होत आहेत. जर ऑक्टोबर महिन्यात ही कारवाई झाली असेल, तर संबंधित वाळूचा साठा इतक्या कालावधीनंतरही त्याच स्थितीत कसा राहिला, याबाबत चर्चा सुरू आहे. काही स्थानिकांच्या मते, साठ्यातील वाळू ओल्या स्वरूपात असल्याचे दिसून येत असून, तो अलीकडील असल्याचा दावा केला जात आहे.

तसेच, ऑक्टोबर मधील कारवाईनंतर जप्त करण्यात आलेली वाळू पोलिसांच्या पंचनाम्यात होती की महसूल विभागाच्या ताब्यात होती, याबाबतही स्पष्टता नसल्याचे बोलले जात आहे. जर साठा महसूल विभागाच्या ताब्यात असेल, तर तो नदीकाठी का ठेवण्यात आला होता, तसेच पोलिसांच्या पंचनाम्यात असल्यास तो मालखान्याय जमा का करण्यात आला नाही, याची उत्तरे बहुतेक पिठावर रेघोट्या लिहिणाऱ्याला माहित नसतील.ऑक्टोम्बर मध्ये जेव्हा छापा टाकण्यात आला होता नांदेड ग्रामीणचे पोलीस उप निरीक्षक भोसले सुद्धा होते. त्यांनीच त्या वाळू छाप्याची तक्रार दिलेली आहे. मग त्या गुन्ह्यातील मुद्देमाल सांभाळण्याची जबाबदारी त्या गुन्ह्याच्या तपासिक अमलदारांचीच असते ना.

या संपूर्ण प्रकरणामुळे कारवाईची पारदर्शकता, जप्त मालाची जबाबदारी आणि संबंधित प्रसिद्धीमागील हेतू यांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी गरज आहे म्हणजे बातमीचा जन्मदाता कोण आहे हे समोर येईल. गोडी मीडिया दिल्लीत आणि राज्यांच्या राजधानीतच नसतो तर तो जिलयाच्या स्तरावर आला आहे असेच आता म्हणावे लागेल.

Post Views: 243






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *