सावदा घाटात बसचा भीषण अपघात:खिडक्या-दरवाजे तोडून प्रवाशांना काढले बाहेर; एकाचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी




नाशिकहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी लक्झरी बसला मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. गुजरात महामार्गावरील करंजाळी-सावदा घाटात रात्री ११ वाजेच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याकडेला उलटली. या भयंकर दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, ५ ते ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. धोकादायक वळणावर नियंत्रण सुटले मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री लक्झरी बस नाशिकहून गुजरातच्या दिशेने प्रवास करत होती. बस सावदा घाटातून जात असताना एका धोकादायक वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण अचानक सुटले. गाडीचा वेग आणि घाटातील वळण यामुळे बस थेट रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात एका प्रवाशाचा गंभीर मार लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. खिडक्या आणि दरवाजे तोडून प्रवाशांची सुटका अपघाताची माहिती मिळताच पोलीस, आरोग्य विभागाचे पथक आणि तहसीलदार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. बस उलटल्याने अनेक प्रवासी आतमध्ये अडकले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी बसच्या खिडक्या, दरवाजे आणि छतावरील एसीचे व्हेंट तोडून सर्व प्रवाशांना बाहेर काढले. मध्यरात्रीची वेळ आणि घाटाचा रस्ता यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी आल्या, मात्र प्रशासनाने तत्परता दाखवत अडकलेल्या प्रवाशांची सुटका केली. जखमींवर उपचार सुरू या दुर्घटनेतील ५ ते ६ गंभीर जखमी प्रवाशांना तत्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालय आणि नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमी प्रवाशांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत असून जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हेही वाचा.. पोलिस उपनिरीक्षकाच्या कारची धडक; दुचाकीस्वार जागीच ठार:दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल; उपनिरीक्षक जखमी ‎ दिंडोरी-वणी राज्यमार्गावर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत लखमापूर येथील कामगाराचा जागीच मृत्यू झाला. शिवदत्त सुखदेव शिंदे (रा. लखमापूर) असे मृताचे नाव असून, ते लखमापूर येथील कंपनीत कार्यरत होते. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक संतोष छगन कडाळे यांच्याविरोधात दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *