अपघातात मुलगा,आई आणि बहिणीचा मृत्यू – VastavNEWSLive.com
हदगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील हडसनी फाटा ते तामसा रोडवर 22 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाढदिवसाच्या कार्यक्रमातून दुचाकीवरून परत येत असताना चारचाकी (MH 12 KN 2509) आणि दुचाकी (MH 26 CG 7954) यांच्यात झालेल्या धडकेत हा अपघात झाला. या दुर्घटनेत रेखाबाई भाऊराव नरवाडे (वय 40), यशवंत भाऊराव नरवाडे (वय 23, रा. निवघा बाजार ता. हदगाव जि. नांदेड) तसेच अनुसयाबाई बालाजी लोणारे (रा. दरेकरवाडी ता. मुदखेड जि. नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातस्थळी आणखी एका वाहनाचा स्वतंत्र अपघात झाला असून त्या वाहनावरील दोघांचा या घटनेशी कोणताही संबंध नाही. जखमींवर निर्मल हॉस्पिटल, नांदेड येथे उपचार सुरू आहेत. हदगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Post Views: 23
