MP सह 5 राज्यांना पावसाचा अलर्ट:यूपीच्या गावांत घुसल्या मगरी, आसामच्या 5.64 लाख लोकांना फटका; केदारनाथ, वैष्णोदेवी यात्रा स्थगित




उत्तर भारतात पावसाचा जोर कायम आहे. पाच राज्यांसाठी सामान्य ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानमधील चार जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर उर्वरित जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ लागू आहे. मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील २४ ते ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात सलग दहा दिवस पडलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शारदा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, पुराचे पाणी नदीकाठच्या गावांमध्ये शिरले आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, रस्ते आणि शेतात मगरी फिरताना दिसून आल्या आहेत. आसाममधील १६ जिल्ह्यांत ५ लाखांहून अधिक लोक पुरामुळे बाधित झाले आहेत. केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील वैष्णो देवी यात्राही मुसळधार पावसामुळे गेल्या चार दिवसांपासून थांबवण्यात आली आहे. 22 जुलै रोजी देशावर दाटलेल्या ढगांची सॅटेलाइट इमेज… देशभरातील हवामानाशी संबंधित फोटो… देशभरातील हवामानाच्या अपडेट्ससाठी खालील ब्लॉग वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *