Congress Protest in Chhatrapati Sambhajinagar Against NEET Paper Leak


छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आज क्रांती चौकात तीव्र निदर्शने आणि रस्ता रोको आंदोलन केले. देशातील शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी, NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरण आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवरील पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधा

.

या आंदोलनाचे नेतृत्व शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांनी केले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेल्या अन्यायाचा निषेध केला.

ॲड. सय्यद अक्रम यांनी यावेळी बोलताना सांगितले की, देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित NEET परीक्षेत पेपरफुटी होणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवर करण्यात आलेला लाठीहल्ला लोकशाही मूल्यांवर आघात असून, काँग्रेस पक्ष अशा दडपशाहीचा तीव्र निषेध करतो, असेही ते म्हणाले.

काँग्रेसच्या आंदोलनानंतर काही भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते गांधी भवन, शहागंज येथील काँग्रेस पक्ष कार्यालयावर आंदोलन करण्यासाठी आले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या भूमिकेचा निषेध करत तीव्र विरोध दर्शवला.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, NSUI प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके, सांस्कृतिक विभाग प्रदेश कार्याध्यक्ष राजेश मुंढे, अशोक डोळस, इकबालसिंग गिल, डॉ. निलेश आंबेवाडीकर, इंजि. विशाल बन्सवाल, अबीद हुसैन सय्यद, मोहम्मद जाकेर, आमेर अब्दुल सलीम, सागर नागरे, शेख कैसर बाबा, गौरव जैस्वाल, शेख अथर, सुरेश पवार, शेख अब्दुल रईस, मुझफ्फर खान यांच्यासह काँग्रेसचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *