बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरीच्या 6 जागांवर मतदान:बंगालमध्ये हुमायून कबीर यांना अटक; ममता ना CM, ना आमदार, ना उमेदवार

[ads1]


पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या चार राज्यांमधील सहा जागांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. मतदान सुरू असतानाच पोलिसांनी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे ‘आम जनता उन्नयन पार्टी’चे (AJUP) प्रमुख आणि आमदार हुमायून कबीर यांना त्यांच्या पक्षाच्या कार्यालयातून अटक केली. निवडणुकीशी संबंधित अनियमिततेचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांचे पुत्र गुलाम नबी आझाद हे देखील रेजीनगर मतदारसंघातून उमेदवार आहेत. दुसरीकडे, प्रसारमाध्यमांशी बोलताना नंदीग्राममधील काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांनी आरोप केला की, त्यांच्या मतदान प्रतिनिधींना (पोलिंग एजंट्सना) बळजबरीने उचलून नेले जात आहे. ज्या जागांसाठी मतदान होत आहे, त्यामध्ये पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर, तामिळनाडूतील मदुरांथकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतील थट्टानचावडी विधानसभा आणि आसाममधील नागाव लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या सर्व जागांचे निकाल ९ ऑक्टोबर रोजी जाहीर केले जातील. पोटनिवडणुकीशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी खालील लाइव्ह ब्लॉग पाहा…

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *