नांदेड (प्रतिनिधी)- वजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अबचलनगर परिसरातील साहेबजादा फत्तेसिंग मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलगा-मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून ते २० जून २०२६ या कालावधीत संबंधित विवाह सोहळा पार पडला.
या प्रकरणी फिर्यादी राजेंद्रसिंघ सुंदरसिंघ शाहू (वय ४८, रा. बडपुरा, नांदेड) यांच्या तक्रारीवरून वजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७०/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ मधील कलम ९, १० आणि ११ अन्वये कारवाई करण्यात आली असून पुढील तपास वजीराबाद पोलिस करीत आहे
Post Views: 18
