माळटेकडी उड्डाणपुलाजवळ जुगार अड्ड्यावर धाड ;5 लाख 1 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी माळटेकडी पुलाजवळील चिकुच्या मळ्यात जुगार खेळणाऱ्यांवर धाड टाकून 7 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 5 लाख 1 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार ज्ञानेश्र्वर केशव कलंदर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणि अंमलदारांसह 6 जानेवारीच्या रात्री 11.45 वाजता माळटेकडी शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाच्या शेजारी चिकुच्या मळ्यात छापा टाकला. त्या ठिकाणी रवि उर्फ प्रभाकर सखाराम सरोदे(35) रा.पुर्णा रोड नांदेड, शेख जहीर शेख पाशा(40) रा.महेबुबनगर , राहुल गणपत सरोदे (28) रा.राज कॉर्नर नांदेड, सय्यद अर्शद, अर्जून पावडे दोघे रा.पावडेवाडी नांदेड, माधव पावडे आणि प्रदीप बगाटे दोघे रा.सुमेधनगर हे सर्व जण जुगार खेळत होते. त्या जुगाराचे नाव झन्ना-मन्ना असे आहे. या ठिकाणी रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा 5 लाख 1 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 12 तसेच मुंबई जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा क्रमांक 24/2025 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणात पहिल्या तीन आरोपीतांना 7 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्रीनंतरच्या 3.53 वाजता स्टेशन डायरी नोंद क्रमांक 05 नुसार नोटीस देवून जामीन देण्यात आला आहे. यावरून असे दिसते की, इतर चार फरार आहेत.
Post Views: 100