![]()
भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हा परिषद परिसरात एकच खळबळ उडाली. जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा धक्कादायक प्रकार घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.वेळेत पोलिसांनी जमेची बाजू घेतली. स्वावलंबी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका रत्नमाला मेंढे यांच्यावर झालेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ प्रदीप कांबळे यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पर्यवेक्षक पदाला मान्यता देऊन वेतन काढण्यासाची जबाबदारी होती.पण माझ्यावर अन्याय केला असल्याचा आरोप रत्नमाला मेंढे यांनी केला असून, याविरोधात गेल्या आठवडाभरापासून शिक्षण विभागासमोर आंदोलन सुरू होते. यापूर्वीही प्रशासनाला इशारा देण्यात आला होता, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे. पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले, मोठा अनर्थ टळला सोमवारी रोजी अचानक प्रदीप कांबळे यांनी अंगावर डिझेल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न करताच उपस्थित पोलिस व कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी कांबळे आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत कांबळे यांना ताब्यात घेतले व मोठा अनर्थ टळला. दोषींवर कारवाईची मागणी या घटनेनंतर जिल्हा परिषद परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, रत्नमाला मेंढे यांना न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहर पोलिस धाव घेतली आहे.
प्रशासकीय अन्यायाविरुद्ध संतापाचा भडका!:भीम आर्मी जिल्हाध्यक्षांचा झेडपीत आत्मदहनाचा प्रयत्न, प्रजासत्ताक दिनी वर्ध्यात खळबळ
