विनंतीवरुन पुर्वी 8 वर्ष काम केलेल्या पोलीस अंमलदाराला पुन्हा भाग्यनगर पोलीस ठाणे बहाल
नांदेड(प्रतिनिधी)-डिसेंबर महिन्यात एका पोलीस अंमलदाराला दुसऱ्यांदा पोलीस ठाणे भाग्यनगर येथे पाठविण्याचे आदेश पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी दिले आहेत. या पोलीस अंमलदाराने या पुर्वी जवळपास 7 ते 8 वर्ष त्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात काम केलेले आहे. तसेच दुसऱ्याही एका पोलीस अंमलदाराला भाग्यनगर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्या अंमलदारांची सुध्दा दुसरी टर्म आहे असे पुर्वी भाग्यनगर पोलीस ठाण्यात असलेल्या एका पोलीस अंमलदाराने वास्तव न्युज लाईव्हला सांगितले आहे.
दि.24 डिसेंबर रोजी 2024 रोजी जावक क्रमांक, आस्था-2/ विनंती/ बदली-पोलीस अंमलदार/2024-13207 या पत्र क्रमांकाप्रमाणे नांदेडच्या शहर वाहतुक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार धनंजय दत्तात्रय कुंभरवार यांना त्वरीत प्रभावाने भाग्यनगर पोलीस ठाण्यात बदली देण्यात आली आहे. पोलीस ठाणे भाग्यनगर येथील आवक क्रमांक 3060/2024 नुसार दि.31/12/2024 रोजी नोंद झाली आहे. भाग्यनगरच्या पोलीस निरिक्षकांनी 30 डिसेंबर 2024 रोजी हे पत्र हजेरी मेजरकडे पाठविले आहे.
धनंजय कुंभरवार यांनी यापुर्वी जवळपास 7 ते 8 वर्ष भाग्यनगर पोलीस ठाण्यात काम केले असल्याची माहिती यापुर्वी भाग्यनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अंमलदाराने सांगितली. तसेच दुसऱ्या एका पोलीस अंमलदाराचे सुध्दा याच पध्दतीने दुसऱ्यांदा भाग्यनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. पण त्या संदर्भाचे आदेश आम्हाला प्राप्त झाले नाहीत. भाग्यनगरमध्ये पुर्वी कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदाराने वास्तव न्युज लाईव्हला सांगितले की, मला सुध्दा परत पोलीस ठाणे भाग्यनगर येथे जायचे आहे कारण माझ्या पत्नीला गंभीर आजार आहे. माझे घर पोलीस ठाणे भाग्यनगरपासून जवळ आहे. पण माझ्या विनंतीचा विचार होत नाही.
एप्रिल-मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या केल्या जातातच पण डिसेंबर महिन्यात केलेल्या काही विनंतीच्या बदल्यांबद्दल पोलीस दलात भरपुर्वी चर्चा आहे. ज्यांनी पुर्वी पोलीस ठाणे केले आहे. त्यांनाच ते पोलीस ठाणे का बहाल केले जात आहे याची चर्चा सुध्दा सुरू आहे.
Post Views: 273